मुंबई: अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा 'गली बॉय' सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच देशभरात फार चर्चेत आहे. जर्मनीच्या बर्लिन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांनी सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. सिनेमा पुढच्या आठवड्यात सिनेमागृहात दाखल होणार असून बॉलिवूड मंडळी खूप सिनेमासाठी उत्साहित आहेत. नुकताच 'उरी' फेम विकी कौशल एका व्हिडिओमध्ये रॅप करताना दिसत आहे. 'गली बॉय' सिनेमातील 'मेरी गली में' या गाण्यावर ताल धरताना विकी कौशल दिसत आहे.
Shout to @vickykaushal09 for being part of the #GullyBoy movement@RanveerOfficial pic.twitter.com/D0jdwdxisa
— mustafa (@thatboymusty) February 7, 2019
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रणवीरने सांगितले, 'रॅप मला लहानपणापासूनच फार जवळचा आणि आवडतीचा विषय आहे.' रणवीर सिनेमात स्ट्रिट रॅपरची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणवीरच्या भूमिकेशी प्रभावित होत विकी कौशलने रॅप गातना व्हिडिओ शेअर करत सिनेमाचे प्रमोशन केले आहे.
उरी सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता विकी कौशल आणि रणवीर सिंग एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन करण जोहर करणार आहेत. तख्त नावाचा हा सिनेमा 2020 मध्ये प्रदर्शीत होणार आहे. हा सिनेमा एतिहासिक कथानकावर आधारित असणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विकी कौशल सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे तर रणवीर दारा शिकोह यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. सिनेमात रणवीर आणि विकी व्यतिरिक्त जान्हवी कपूर, आलिया भट्ट, अनिल कपूर सुद्धा झळकणार आहेत. 'उरी' सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगलीच मजल मारली आहे. सिनेमाने एक महिन्याच्या आत 200 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.