'खतरों के खिलाडी' च्या सेटवर 2 सेलिब्रिटी गंभीर जखमी

कोण आहेत हे 2 कलाकार 

'खतरों के खिलाडी' च्या सेटवर 2 सेलिब्रिटी गंभीर जखमी title=

मुंबई : 'खतरों के खिलाडी' सिझन 9 ची शुटिंग सुरू झाली आहे. यावेळी टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटी या सिझनमध्ये पाहायला मिळणार आहे. या शोच शुटिंग अर्जेंटीनामध्ये होत आहे. तिथून आता खूप मोठी बातमी आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुटिंग दरम्यान दोन स्पर्धक जखमी झाले आहेत. यामुळे खूप मोठा गोंधळ उडाला आहे. 

हे दोन स्पर्धत आहेत टेलीव्हिजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय कलाकार. विकास गुप्ता आणि जैन इमाम या दोन स्पर्धकांना गंभीर दुखापत झाली आहे. या दोघांनी देखील आपले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. विकास गुप्ताच्या पायाला दुखापत झाली होती. तर जैनच्या ओठाला दुखापत झाली आहे. विकास गुप्ता हे टेलिव्हीजनमध्ये प्रोड्यूसरमध्ये काम केलं आहे. विकास 'खतरों के खिलाडी' ते 'बिग बॉस 11' मध्ये देखील दिसला आहे. जैन हा नामकरण मालिकेत दिसला होता. खतरों के खिलाडी जानेवारीत सुरू होणार आहे. 

खतरों के खिलाडीमध्ये हे कलाकार 

खतरों के खिलाडी सिझन 9 मध्ये कॉमेडिअन भारती आणि तिचा नवरा हर्ष यामध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. यासोबतच रिद्धिमा पंडित, अली गोनी जैन इमाम, जास्मनी भसीन, शमिता शेट्टी, आदित्य नारायण, अविका गौर आणि श्रीसंत देखील दिसणार आहे. या शोच शुटिंग 15 जुलै रोजी सुरू झालं आहे.