'करुन घेतला अपमान!' म्हणत विजय वर्माने Insta स्टोरीमधून उडवली राष्ट्रीय संस्थेच्या माजी अध्यक्षांची खिल्ली

Vijay Varma Instagram Story: सोशल मीडियावर अनेकांनी पायलला पुरस्कार मिळाल्यानंतर तिचं अभिनंदन करणाऱ्या तिच्या आधीच्या शिक्षण संस्थेवर टीकाची झोड उठवली आहे. विशेष म्हणजे आता या कलाकारांचाही समावेश झाला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 31, 2024, 04:41 PM IST
'करुन घेतला अपमान!' म्हणत विजय वर्माने Insta स्टोरीमधून उडवली राष्ट्रीय संस्थेच्या माजी अध्यक्षांची खिल्ली title=
विजयची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत

Vijay Varma Instagram Story: अभिनेता विजय कुमारने पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’च्या म्हणजेच एफटीआयआय माजी अध्यक्षांना सुनावलं आहे. राष्ट्रीय संस्था असलेल्या एफटीआयआयचे माजी अध्यक्ष राहिलेल्या गजेंद्र चौहान यांनी कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या चित्रपटनिर्मात्या पायल कपाडियाचं कौतुक केलं आहे. तिच्यातील निर्मात्याचा मला फार अभिमान आहे असं गजेंद्र चौहान यांनी म्हटलं आहे. पायल कराडियाच्या 'ऑल वी कॅन इमॅजिन अॅज लाइट' चित्रपटाला मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर चौहान यांनी हे विधान केलं आहे. मात्र याच अभिनंदावरुन विजय कुमारने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गजेंद्र चौहान यांना सुनावलं आहे. 

विजय वर्मा काय म्हणाला?

विजय वर्माने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये गजेंद्र चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. या स्टोरीमध्ये पायलने अभ्यास केलेल्या एफटीआयआटचे माजी अध्यक्ष म्हणून तिच्या कामगिरीबद्दल अभिमान वाटतो, असं गजेंद्र चौहान सांगत असल्याचा उल्लेख आहे. पीटीआयला चौहान यांनी दिलेल्या मुलाखतीमधील मजकूर या स्टोरीत आहे. चौहन यांनी, "पायलंचं अभिनंदन. मला अभिमान वाटतो की मी अध्यक्ष असताना ती संस्थेमध्ये शिक्षण घेत होती," असं म्हटलं आहे. या स्टोरीवर विजयने, 'करवा ली बेज्जती' म्हणजेच 'करुन घेतला अपमान' असं लिहिले मिम शेअर केलं आहे. "सर हा कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहण्याची वेळ होती," असंही विजयने हसण्याचा इमोजी शेअर करत म्हटलं.  या पोस्टमधून विजयला गजेंद्र चौहान यांना 'तुम्ही तोंड घडू नका' असेच सुचवायचे आहे.

पायल प्रकरणावरुन गजेंद्र चौहानांविरोधात संताप का?

पायलने कान्स चित्रपट मोहोत्सवामध्ये 'ले ग्रॅण्ड पिक्स' हा मानाचा पुरस्कार जिंकला. त्यानंतर एफटीआयआयने सोशल मीडियावरुन अनेकदा पायल ही संस्थेची माजी विद्यार्थी असल्याचा दावा केला. मात्र पायल या संस्थेत असतानाच तिने तत्कालीन अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरुद्ध विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यावेळेस तिला निलंबित करत तिच्याविरोधात कायदेशीर कारवाईही करण्यात आली होती. आता पुरस्कार मिलाल्यानंतर संस्था पायलच्या यशाचं श्रेय घेऊ पाहत असल्याचा आरोप चाहते करत आहेत. त्यामुळेच गजेंद्र चौहान यांनी ती विद्यार्थीनी असतानाच तिच्यावर कारवाई केली आणि आता पुरस्कार मिळाल्यावर तिचं कौतुक करत दुटप्पीपणा दाखवत असल्याचं सांगत टीकेची झोड सोशल मीडियावर उठली आहे. टीका करणाऱ्यांमध्ये आता विजय वर्मासहीत अनेक कलाकारही सहभागी झाले आहेत. तुम्हीच पाहा विजयची इन्स्टाग्राम स्टोरी

 

अली फजलनेही लगावला टोला

रिचा चढ्ढाचा पती आणि अभिनेता अली फजलनेही एफटीआयआयने सोशल मीडियावर पायलच्या अभिनंदनासाठी केलेल्या पोस्टवर तुम्ही हे पोस्ट करण्याची गरज नव्हती अशापद्धतीची खोचक प्रतिक्रिया आपल्या खासगी अकाऊंटवरुन नोंदवली होती.