'मुलीची इच्छा नाही की मी लग्न करावं'; तमन्नासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर विजय वर्मा असं का म्हणतोय?

Vijay Varma on Wedding plan : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तमन्नासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 27, 2023, 10:41 AM IST
'मुलीची इच्छा नाही की मी लग्न करावं'; तमन्नासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर विजय वर्मा असं का म्हणतोय? title=
(Photo Credit : Social Media)

Vijay Varma on Wedding plan : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा हे त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. ते दोघं अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी जूनमध्ये खुलासा केला आहे. त्याआधी त्यांचा न्यू इयर साजरा करताना व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत ते दोघे किस करताना दिसले होते. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत राहिला. काही दिवसांपूर्वी ते दोघे लवकरच लग्न बंधनात अडकतील अशी बातमी समोर आली आहे. ते लवकरच त्यांच्या नात्याला नाव देणार आहेत. आता या बातम्यांवर विजय वर्मानं वक्तव्य केलं आहे. 

तमन्ना आणि विजयच्या रिलेशनशिपविषयी त्यांच्या घरच्यांना कळल्यानंतर त्यांची इच्छा आहे की त्या दोघांनी लवकरच लग्न करावे. त्यात अशी बातमी समोर आली आहे की त्या दोघांचे आई-वडील त्यांच्यावर लग्नाविषयी दबाव टाकत आहेत. त्याच चर्चांवर विजयनं प्रतिक्रिया दिली आहे. पिंकव्हिलानं दिलेल्या रिपोर्टनुसार, विजयनं म्हटलं की 'मी लग्न करावं असं कोणत्याही मुलीला वाटत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे... ना त्याचं उत्तर माझ्या आईला देऊ शकतो नाही दुसऱ्या कोणाला.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विजय मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेल्याचे पाहायला मिळाले. विजयनं सोशल मीडियावर त्याच्या या ट्रीपचे फोटो शेअर केले होते. त्यात तो खूप आनंदी आहे हे पाहायला मिळालं. त्याला या ट्रीपमध्ये एकट्याला पाहून नेटकऱ्यांनी त्याला तमन्नाविषयी विचारले. एका नेटकऱ्यानं प्रश्न विचारला की एकटा का आहेस विजय, तुझी लेडी लव्ह कुठे आहे? दुसरा नेटकरी म्हणाला, काही तरी मिसिंग आहे. तिसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं की वहिणी नाही आली का? तर एका नेटकऱ्यानं म्हटलं की त्याचे सगळे फोटो हे तमन्नानं क्लिक केले आहेत. 

हेही वाचा : बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या 'या' मुलीला ओळखलंत का! अक्षयपासून संजय दत्तपर्यंत अनेकांशी जोडलं नाव

या दोघांनी 2023 चं न्यू इयर सेलिब्रेशन हे एकत्र केलं होतं. त्यांच्या गोव्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. इतकंच नाही तर दोघांनी किस करतानाचा व्हिडीओ पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात ही 'लस्ट स्टोरीज 2' च्या सेटवर झाली. या सीरिजमध्ये ते दोघं नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसले.