Vijay Deverakonda नं केलं Organ Donation, म्हणाला 'माझ्या आईनं...'

Vijay Deverakonda नं नुकत्याच हजेरी लावलेल्या एका कार्यंक्रमात हा खुलासा केला आहे, दरम्यान, यावेळी त्याच्या आईनंही हा निर्णय घेतल्याचे सांगितले. 

Updated: Nov 17, 2022, 05:56 PM IST
Vijay Deverakonda नं केलं Organ Donation, म्हणाला 'माझ्या आईनं...' title=

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विजय हा नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं खुलासा केला आहे की त्यानं अवयव दान करण्यासाठी लागणारी सगळी फॉर्मॅलिटीज पूर्ण केले (Organ Donation) आहेत.  (Vijay Deverakonda Donate Organ) 

कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर विजय म्हणाला, 'डॉक्टरांनी मला सांगितलं की अनेक शस्त्रक्रिया केवळ डोनरमुळेच होतात. बरेच लोक इतर लोकांसाठी डोनट करत ​​आहेत यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण हे सगळ्यात चांगलं काम आहे. यासोबतच दक्षिण आशियाई देशांमध्ये अवयवदानाचे प्रमाण इथल्या तुलनेत कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, असं विजय म्हणाला. (Vijay Deverakonda On Organ Donation) 

अवयव दान करण्याविषयी काय म्हणाला विजय देवरकोंडा -

विजय पुढे म्हणाला, 'मला वाटतं मी माझे सर्व अवयव दान करेन. माझ्या निधनानंतर माझे सगळे अवयव कोणाच्या कामी येतील त्यांचा उपयोग होईल हे मला आवडेल. माझे अवयव असेच वाया घालवून काय फायदा. मी फीट राहतो आणि स्वतःला निरोगी ठेवतो. मी आणि माझ्या आईनं अवयव दान करण्यासाठी नोंदणी केली आहे. अवयव दान केल्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्ही जिवंत राहता. मी सर्वांना अवयवदानाचा विचार करण्यास सांगतो.'

हेही वाचा : 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचं दीर्घ आजारानं निधन!

विजयनं केलेल्या या कामाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. त्याचे चाहते त्याला असा विचार करण्यासाठी अनेकांना प्रेरणा देत असल्याचे म्हटले आहे. विजयचा हा व्हिडिओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, “विजय देवरकोंडाचे हृदय खूप मोठे आहे. अवयवदान ही छोटी गोष्ट नाही.' (Vijay Deverakonda Will Donate All His Organ Along With His Mother Know What He says) 

विजय सगळ्यात शेवटी 'लायगर' (Liger) या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात विजयसोबत अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. लवकरच विजय समंथा रुथ प्रभूसोबत दिग्दर्शक शिव नारायण यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात दिसणार आहे.