चाहत्याने सुरक्षा भेदली अन् पळत जवळ पोहोचणार इतक्यात...; पाहा विजय देवरकोंडाने काय केलं?

Vijay Deverakonda: बेबी (Baby) चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात एका चाहत्याने सुरक्षा भेदत विजय देवकरकोंडापर्यंत (Vijay Deverakonda) पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी विजय देवकरोंडा घाबरला आणि मागे पळत गेला.  या चित्रपटात विजय देवरकोंडाचा भाऊ मुख्य भूमिकेत आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 20, 2023, 12:26 PM IST
चाहत्याने सुरक्षा भेदली अन् पळत जवळ पोहोचणार इतक्यात...; पाहा विजय देवरकोंडाने काय केलं? title=

Vijay Deverakonda: दाक्षिणात्य चित्रपटांमधील अभिनेत्यांचा चाहतवर्ग किती मोठा आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. चित्रपटांच्या ट्रेलर रिलीजदरम्यान किंवा इतर कार्यक्रमात चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेकदा सुरक्षा भेदतात. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. विजय देवरकोंडाचाही चाहतावर्ग त्याची एक झलक पाहण्यासाठी आतूर असतात. नुकतंच त्यालाही आपल्या चाहत्याचा वेडेपणा अनुभवण्याची संधी मिळाली. पण अचानक घडलेल्या या घटनेने तो इतका घाबरला की मागे पळत सुटला. 
 
बेबी (Baby) चित्रपटाच्या यशाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात एका चाहत्याने सुरक्षा भेदत विजय देवकरकोंडापर्यंत (Vijay Deverakonda) पोहोचण्याचा प्रयत्न केला. चाहत्याने मंचावर उडी मारुन पाया पडण्याचा प्रयतन केला. पण पण यावेळी विजय देवकरोंडा घाबरला आणि मागे पळत गेला.  या चित्रपटात विजय देवरकोंडाचा भाऊ आनंद देवरकोंडा मुख्य भूमिकेत आहे. विजय देवरकोंडा या कार्यक्रमात मुख्य पाहुणा म्हणून उपस्थित होता. 

विजय प्रमुख पाहुणा असल्याने मंचावर उभं राहून चाहते आणि उपस्थितांशी संवाद साधत होता. याचवेळी एका चाहत्याने सुरक्षेचं कडं भेदलं आणि मंचाच्या दिशेने धावत सुटला. तरुण आपल्या दिशेने अचानक धावत आल्याने विजय देवरकोंडाला काहीच कळत नाही. चाहता पाया पडणार इतक्याच विजय देवकरकोंडा मागे सरकतो. त्याचवेळी सुरक्षारक्षक मध्यस्थी करतो आणि चाहत्याला विजय देवरकोंडाच्या जवळ जाण्यापासून रोखतो. 

दरम्यान, विजय देवरकोंडा सध्या हैदराबादमध्ये 'VD 12' चित्रपटाचं शुटिंग करत आहे. जर्सी फेम गौतम तिन्नौरी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात विजयसह मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा त्यांचा पहिलाच एकत्रित चित्रपट असणार आहे. याशिवाय विजय देवरकोंडा आणि समांथा यांचा 'खुशी' चित्रपट 1 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.