'...तो देश कभी माफ नहीं करेगा'; 'कमांडो ३'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

पाहा चित्रपटाचा ट्रेलर...

Updated: Oct 25, 2019, 06:52 PM IST
'...तो देश कभी माफ नहीं करेगा'; 'कमांडो ३'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal)स्टारर बहुचर्चित 'कमांडो ३' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ट्रेलर चांगलाच व्हायरल होत आहे. 'कंमाडो ३' मध्ये पुन्हा एकदा विद्युत जामवाल जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळतोय. 

चित्रपटाच्या ट्रेलरमधून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता कमालीची वाढली आहे. २०१७ मध्ये 'कमांडो २'ला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली होती. काळ्या पैशाबाबतची लढाई चित्रपटात दाखवण्यात आली होती. त्यानंतर 'कमांडो २'च्या भरघोस यशानंतर पुन्हा एकदा 'कमांडो ३'सह चाहत्यांना जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. 

  

आदित्य दत्त यांनी 'कमांडो ३'चं दिग्दर्शन केलं आहे. विद्युत जामवालशिवाय (Vidyut Jammwal)चित्रपटात अदा शर्मा, अंगीर धर, गुलशन देवाइया प्रमुख भूमिका साकारत आहेत. येत्या २९ नोव्हेंबर रोजी 'कमांडो ३' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'कमांडो', 'कमांडो २' नंतर आता 'कमांडो ३'लाही प्रेक्षकांची पसंती मिळणार का? हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे.