Vidya Balan : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. ती नेहमीच प्रत्येक विषयावर तिला जे काही वाटतं ते सांगताना दिसते. दरम्यान, तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की धर्माच्या नावावर ध्रुवीकरण वाढत असल्याचं म्हटलं आहे. धर्मा विषयी खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते. आजकाल लोक सतत काहीतरी शोधत असतात ज्यामुळे त्यांची ओळख निर्माण होऊ शकेल. सुरुवातीला देशाची कोणतीही अशी धार्मिक ओळख नव्हती, पण आता परिस्थिती वेगळी आहे.
विद्या बालननं ही मुलाखत 'अनफिल्टर्ड बाय सॅमडिश'ला दिली होती. यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला की तिला वाटतं का की देश आणि धर्म यात ध्रुवीकरण होतंय? यावर उत्तर देत विद्या बालन म्हणाली, "मला वाटतं की आपण नक्कीच मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण करतोय. एका राष्ट्रच्या रुपात सुरुवातील आपली कोणतीही धार्मिक ओळख नव्हती, पण आता मला नाही माहित का... हे फक्त राजकारण नाही, हे सोशल मीडिया देखील आहे. कारण आपण सगळेच या सोशल मीडियाच्या जगात एक ओळख शोधतोय, जी आपल्याकडे नाही. हे स्वाभाविक आहे आणि आपण स्वत: च्या ओळखीसाठी गोष्टींचा शोध घेत आहोत."
विद्या पुढे म्हणाली की तर, सगळं काही असं झालं आहे की... मग हा धर्म असो किंवा जागरुकता, लोक म्हणता की मी हे आहे. पण तुम्हाला माहित नसतं की तुम्ही कोण आहात? हेच कारण आहे की तुम्ही अशा गोष्टींच्या शोधात असतात. आपल्यासगळ्यांना आपलेपणाच्या भावनेची गरज आहे आणि या सोशल मीडिया जगात सगळीकडे पसरलंय, त्यात आधीपासून आपण एकटे झालो आहोत. अतिशय वरवरच्या पातळीवर, आपण सहजपणे कल्पना आणि संकल्पनांशी स्वतःला जोडून घेत आहोत... आज जगाचं ध्रुवीकरण झालं आहे, तो फक्त एक देश नाही.'
विद्यानं हे देखील सांगितलं की ती कोणत्याही धार्मिक वास्तूंच्या बांधकामासाठी पैसे मागणाऱ्या लोकांना ती कधीच देणगी देत नाही. त्यासोबत पुढे तिनं सांगितलं की ती स्वत: आध्यात्मिक असून दररोज पूजा करते. पण तरी ती आरोग्यसेवा, सॅनिटेशन म्हणजे स्वच्छता आणि शिक्षणासंबंधीत विभागांसाठी दान करते. विद्या म्हणाली 'कोणत्याही धार्मिक वास्तूच्या बांधकामासाठी माझ्याकडे कोणी देणगी मागितली, तर मी कधीच देणगी देत नाही. मी म्हणते की तुम्ही हॉस्पिटल, शाळा किंवा शौचालय बांधत असाल तर मी आनंदानं योगदान देईन. पण आता धार्मिक संस्थांसाठी नाही.'
हेही वाचा : 'पराभव स्वीकारून बाबाकडे जाऊ...', बाबिल खाननं वडिलांकडे जाण्याची इच्छा व्यक्त करताच चाहते चिंतेत
विद्यानं हे देखील सांगितलं की 'राजकारणाला खूप घाबरते, मग आम्हाला बॅन वगैरे करतील. नशिब माझ्यासोबत असं झालं नाही, पण आता राजकारणाविषयी बोलता कलाकार सावध होत आहेत. कारण तुम्हाला माहित नाही की कोण नाराज होईल. खरंतर, एका चित्रपटाच्या रिलीजच्या आसपास 200 लोकांचे काम पणाला लागलेलं असतं, त्यामुळे मी इतकंच म्हणते की मला राजकारणापासून दूर ठेवा. हे सगळं सोशल मीडियामुळे होतंय, लोकांना प्रत्येक गोष्टीचं वाईट वाटतं. ज्या गोष्टींची काही माहिती नसते त्याविषयी देखील ते इनपूट देतात. त्यामुळे आपण गप्प करा आणि काम करत राहा.'