Shikara Trailer : संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारा आणणारा ट्रेलर

काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर आधारित 

Updated: Jan 7, 2020, 02:34 PM IST
Shikara Trailer : संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारा आणणारा ट्रेलर title=

मुंबई : दिग्दर्शक विधु विनोद चोप्रांच्या आगामी सिनेमा 'शिकारा'चा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर याचा ट्रेलर लाँच झाला आहे. संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारा आणणारा हा ट्रेलर आहे. 

ट्रेलरची सुरूवात अतिशय प्रेमळ सीनने होतं आहे. एक जोडी शेरोशायरी करत असते. अचानक बाहेरून गोंधळाचा आवाज येतो. बाहेर बघतात तर अनेक घर जळत असताना दिसतात. काश्मिरी पंडितांना पाकिस्तानातून जाण्यास सांगितलं जातं. सिनेमाचा ट्रेलर हा अंगावर काटा उभा करणारा आहे. 

१९९० साली लाखो काश्मिरी पंडितांना एका रात्रीत बेघर केलं गेलं. तीस वर्षांनंतरही त्यांच्या जगण्यात फार काही बदल झालेला नाही. आजही ते निर्वासितांचे जीवन जगत आहेत. या मुद्यावर विधु विनोद चोप्रा आपल्या सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकत आहेत. 

या सिनेमातून नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सादिया आणि आदिल खान हे दोघेही सिनेमातून डेब्यू करत आहे. सादिया शांतीची भूमिका साकारत आहे तर आदिल शीवची. हम आऐंगे अपने वतन वाजीत साहब.... और यही पे दिल लगाऐंगे... यही पर मरेंगे... यही के पानी में हमारी या डायलॉगने ट्रेलरचा शेवट करण्यात आला आहे.

या सिनेमाचं पार्श्वसंगीत ए. आर. रेहमान यांनी केलं असून सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. संवेदनशील माणसाला शहारा आणणारे ट्रेलर. ट्रेलर लाँच होण्याअगोदर सिनेमाची पोस्टर लाँच होऊन उत्सुकता वाढवली जात होती. 2020 मधील सर्वाधिक मोस्ट अवेटेड सिनेमांपैकी हा एक सिनेमा आहे. 7 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.