VIDEO : सुष्मिताने प्रेमाची कबुली दिली खरी, पण....

सुष्मिताच्या खासगी आयुष्यातही 'त्या' खास व्यक्तीचा प्रवेश झाल्याची बाब उघड झाली

Updated: Nov 11, 2018, 01:53 PM IST
VIDEO : सुष्मिताने प्रेमाची कबुली दिली खरी, पण.... title=

मुंबई : चित्रपट म्हणू नका किंवा मग एखादी मोहिम. अभिनेत्री सुष्मिता सेन नेहमीच अनेक गोष्टींसाठी चाहत्यांना प्रोत्साहित करत असते. गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आहे ते म्हणजे खासगी आयुष्यामुळे. 

सेलिब्रिटी रिलेशनशिपच्या चर्चांनी कलाविश्वात जोर धरलेला असतानाच सुष्मिताच्या खासगी आयुष्यातही 'त्या' खास व्यक्तीचा प्रवेश झाल्याची बाब उघड झाली. मुख्य म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पोस्ट करत सुष्मिताने ती  रॉमन शॉल नावाच्या मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चांना दुजोराही दिल्याचं पाहायला मिळालं. 

बी- टाऊनच्या या दिलबर गर्लने पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिटया अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. फिटनेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या व्हिडिओचं कॅप्शनच अनेकांच्या नजरेत येत आहे. 

शब्दांची सुरेख जुळवाजुळव करत या दिलबर गर्लने ज्या अंदाजात तिच्या मेहबूब म्हणजेच रॉमनसोबतच्या नात्याविषयी माहिती दिली आहे ते पाहता तिची दाद द्यावी तितकी कमीच असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

"While the world speculates, I train. Speak of these #rings & this #commitment , and I am game!!All other #gossips can die in vain”  #notgettingmarried (yet) ‘Rohman’cing life ABSOLUTELY!!! #enoughsaid #sharing #mytruth I love you guys beyond!!!! mmuuuaaah!", असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं.

मुख्य म्हणजे तिने हे कॅप्शन लिहित लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती पुढच्या वर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण, तसं काही नसून या सर्व अफवा असल्याचं तिने स्पष्ट केलं. पण, रॉमनसोबतचं नातं तिने नाकारलं नाही. उलटपक्षी एका वेगळ्या अंदाजात तिने या नात्याचा स्वीकार केला.