'बूम डिगी डिगी' या धमाकेदार गाण्याचा सोशल मीडियात धुमाकूळ

दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी ‘सोनू के टीटू की स्विटी’ या सिनेमातील एक धमाकेदार गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

Updated: Feb 8, 2018, 05:32 PM IST
'बूम डिगी डिगी' या धमाकेदार गाण्याचा सोशल मीडियात धुमाकूळ title=

नवी दिल्‍ली : दिग्दर्शक लव रंजनच्या आगामी ‘सोनू के टीटू की स्विटी’ या सिनेमातील एक धमाकेदार गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमातील याआधी रिलीज झालेल्या गाण्यांमध्ये हनी सिंहची जादू बघायला मिळाली. आता पुन्हा एकदा या सिनेमातील एक डान्सिंग गाणं रिलीज करण्यात आलाय. 

‘बूम डिगी डिगी’ असे या धमाकेदार गाण्याचे बोल असून हे गाणं सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. जॅक नाईट आणि जॅसमीन वालिया यांनी हे गाणं गायलं असून जॅक नाईटने संगीत दिलंय. या गाण्यत कार्तिक आर्यन आणि सनी सिंह दोघे दिसत आहेत. याआधी सिनेमातील रिलीज झालेल्या ‘दिल चोरी साडा’ आणि ‘छोटे छोटे पेग बना’ या हनी सिंहच्या गाण्यांनी आधीच धमाका केला होता. 

या सिनेमात कार्तिक आर्यन, नुसरत भरूचा आणि सनी सिंह मुख्य भूमिकेत असणार आहे. दोनी मित्रांची ही कथा असून प्रेमाचा त्रिकोण यात दाखवण्यात आला आहे. येत्या २३ फेब्रुवारीला हा सिनेमा रिलीज होणार आहे.