आता माधुरीच्या एक दो तीन वर थिरकणार 'ही' अभिनेत्री...

आजकाल जुन्या गाण्यांचे रिमिक्स व्हर्जन बनवण्याचा ट्रेंड आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 8, 2018, 05:20 PM IST
आता माधुरीच्या एक दो तीन वर थिरकणार 'ही' अभिनेत्री... title=

नवी दिल्ली : आजकाल जुन्या गाण्यांचे रिमिक्स व्हर्जन बनवण्याचा ट्रेंड आहे. त्याशिवाय कोणताही चित्रपट पूर्ण होत नाही. हा ट्रेंड बागी २ हा चित्रपटातही दिसून येणार आहे. टाइगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या बागी २ या चित्रपटात ९० च्या दशकातील एक सुपरहीट गाणे असणार आहे. हे गाणे धक धक गर्ल माधुरी दीक्षितवर चित्रित झाले होते. तेजाब चित्रपटातील तिचे सुपरहीट गाणे एक दो तीन...

आता थिरकणार ही अभिनेत्री

या गाण्यावर आता जॅकलिन थिरकणार आहे. या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य आणि अहमद खान या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन करत आहेत. तर गाण्यासाठी डिझायनर मनीष मल्होत्रा, जॅकलीनसाठी ड्रेस डिझाईन करत आहे.

जॅकलिनचा डान्स पाहणे औत्सुक्याचे 

जॅकलीनच्या लत लग गई आणि जुम्मे की रात या गाण्याची कोरियोग्राफी अहमद खान यांनी केली होती. जॅकलिनसाठी हे गाणे महत्त्वपूर्ण ठरेल. कारण ते गाणे सुप्रसिद्ध आहे आणि माधुरीच्या नृत्याने त्याला बहार आणली होती. आता यावर जॅकलिनचा डान्स किती धमाल आणतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.