'या' व्हिडिओमुळे प्रियाच्या नजरेचा बाण पुन्हा चालला

पाहा तिचा हा व्हिडिओ...

Updated: Oct 29, 2018, 01:28 PM IST
'या' व्हिडिओमुळे प्रियाच्या नजरेचा बाण पुन्हा चालला title=

मुंबई : प्रिया प्रकाश वारियर हे नाव आता सर्वांच्याच ओळखीचं झालं आहे. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ओरु अदार लव या चित्रपटातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

'माणिक्य मलराय पूवी' या गाण्यातील अवघ्या काही सेकंदांचाच भाग व्हायरल झाला. ज्यामधून पहिल्यांदाच प्रिया  सर्वांच्या भेटीला आली होती.

काही सेकंदांच्याच व्हिडिओमधून प्रियाने आपल्या अदांनी आणि नजरेने सर्वांनाच घायाळ केलं होतं. 

तेव्हापासूनच 'ब्लिंकिंग गर्ल' म्हणूनही प्रिया ओळखली जाऊ लागली.

सध्या प्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि चर्चेचं निमित्त ठरत आहे तो म्हणजे सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला आणखी एक व्हिडिओ. 

'ओरु अदार लव'मधील प्रियाचा सहकलाकार रोशन अब्दुल रहूफ याने हा व्हिडिओ पोस्ट केला असून प्रियाच्या स्मितहास्याची आणि तिच्या नजरेच्या बाणाची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. 

आतापर्यंत या  व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून हा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही मल्याळी सौंदर्यवती प्रिया प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतेय असं म्हणायला हरकत नाही.