VIDEO : 'लागिरं झालं जी'मध्ये प्रेमाचा पाऊस!

इतर नवविवाहित जोडप्यांप्रमाणेच हे दाम्पत्यही हनीमूनसाठी निघालेत. 

Updated: Jun 29, 2018, 04:26 PM IST

मुंबई : 'लागिरं झालं जी' या कार्यक्रमात सध्या प्रेमाचा पाऊस बरसतोय... आज्या आणि शितली नुकतेच विवाहबंधनात अडकलेत... त्यातच सेनेत भरती झालेल्या आज्याची कामावर रुजू होण्याची वेळ जवळ येतेय... यामुळे, एकमेकांपासून दूर जाण्याच्या विचारानंच भावुक होणारे आज्या आणि शितली एकमेकांवर प्रेमाची बरसात करताना कार्यक्रमात दिसत आहेत. इतर नवविवाहित जोडप्यांप्रमाणेच हे दाम्पत्यही हनीमूनसाठी निघालेत. महाबळेश्वरमध्ये हे शुटिंग पार पडलंय.