VIRAL VIDEO : कसा होता डॅडीला भेटण्याचा अर्जुनचा पहिला अनुभव

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अर्जुन रामपाल हा त्याच्या आगामी ‘डॅडी’ मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सुद्धा चांगलाच व्हायरल झाला आहे.

Updated: Aug 14, 2017, 11:27 AM IST
VIRAL VIDEO : कसा होता डॅडीला भेटण्याचा अर्जुनचा पहिला अनुभव title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अर्जुन रामपाल हा त्याच्या आगामी ‘डॅडी’ मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सुद्धा चांगलाच व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ त्याच्या डॅडी सिनेमाशी निगडीत आहे. या व्हिडिओत अर्जुन हा गॅंगस्टर अरुण गवळी याच्याबाबत काही सांगताना दिसत आहे. पहिल्या अर्जुन जेव्हा अरूण गवळीला भेटला होता तेव्हाचा अनुभव त्याने शेअर केला आहे.  या व्हिडिओत अर्जुन सांगतोय की, कशाप्रकारे त्याने या सिनेमासाठी अरूण गवळीची परवानगी घेतली. इंग्रजीत तयार करण्यात आलेल्या सिनेमाच्या कॉन्ट्रॅक्टवर अरूण गवळी काय म्हणाला. हे सगळे किस्से त्याने या व्हिडिओत सांगितले आहेत.

मुंबईच्या अधां-या गल्ल्यांमधून येणा-या अरूण गवळीच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे. अरूण गवळीच्या लूकमध्ये अर्जुन रामपाल फारच शोभून दिसतो आहे. त्यामुळेही या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढली आहे. येत्या ८ सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.