विकी कौशलच्या वडिलांचा सेटवर अपमान करत हकलवून लावले तेव्हा...

Vicky Kaushal : विकी कौशलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याविषयी बोलत असताना त्याच्या वडिलांना सेटवर कशी वागणूक मिळाली होती. याविषयी देखील सांगितले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 5, 2023, 02:17 PM IST
विकी कौशलच्या वडिलांचा सेटवर अपमान करत हकलवून लावले तेव्हा... title=
(Photo Credit : Social Media)

Vicky Kaushal : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा लाखो मुलींच्या हृदयावर राज्य करतो. विकी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. इतकंच नाही तर सोशल मीडियावर तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. त्याच्या कुटुंबासोबतचे त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, विकी सध्या त्याच्या कोणत्याही सोशल मीडिया पोस्टमुळे नाही. तर त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतील वक्तव्यामुळे चर्चेत आहे. त्यानं यावेळी त्याचा जन्म कुठे झाला? हृतिकचा तो किती चाहता आहे. त्याशिवाय त्याच्या वडिलांच्या आयुष्यातील सगळ्यात भावूक करणारी गोष्ट सांगितली. त्याच्या वडिलांना अपमानित करत कसं सेटवरून काढल्यानंतर ते कसे रडत घरी यायचे याविषयी सांगितलं आहे. 

विकीनं ही मुलाखती वी आर युवाला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याविषयी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्याविषयी कोणाला काही माहित नव्हते. ज्या विषयी कोणी कोणाला काही सांगणार नाही या सगळ्या गोष्टी विकीनं त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. विकी म्हणाला की 'त्याचे आई-वडील त्याच्या आणि त्याच्या भावापासून काही लपवायचे नाही. विकीनं सांगितलं की जेव्हापण त्याच्या वडिलांना सेटवरून अपमान करून काढून टाकण्यात यायचे तेव्हा ते सगळ्यांसमोर रडायचे.' विकीचे वडील त्यावेळी फक्त एक स्टंटमॅन होते. विकीनं सांगितलं की 'त्याचे वडील हे त्याच्या आईसमोर देखील रडायचे आणि त्यानंतर त्यांना येऊन सांगायचे की मी आज तुझ्या आईसमोर रडलो.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विकीनं पुढे सांगितलं केला की 'त्यानंतर आई देखील सांगायची की तुझ्या वडिलांचा सीनियर्सनं सगळ्यांसमोर अपमान केला.' विकी म्हणाला की 'त्याच्या आईवडिलांनी हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवली की मुलांपासून काही लपवायला नको, कारण ते मग भावनांमध्ये वाहून जाणार नाही ते स्ट्रॉंग राहतील.' 

हेही वाचा : 'जवान' हिट होण्यासाठी शाहरुख लेकीसह पोहोचला तिरुपती बालाजीच्या मंदिरात, VIRAL VIDEO

विकी म्हणाला की 'माझ्या वडीलांनी ही गोष्ट लक्षात ठेवत आम्हाला मोठं केलं की आम्ही भविष्यात कोणत्याही परिस्थितीला घाबरता कामा नये. जेव्हा कधी कोणतीही गोष्ट आपल्याला हवी तशी होत नसेल तर तेव्हा आपण त्यातून कसं बाहेर पडायला हवं हे शिकवलं. अनेकदा आपल्याला पाहिजे तसं आयुष्यात घडत नाही.'