सिद्धार्थ मल्होत्रामुळे विकी कौशलवर रडण्याची वेळ

विकी कौशलने सिद्धार्थसाठी विशेष उल्लेख करत म्हटलं....

Updated: Aug 12, 2021, 05:31 PM IST
सिद्धार्थ मल्होत्रामुळे विकी कौशलवर रडण्याची वेळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी स्टारर फिल्म 'शेरशाह' 12 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला आहे. खऱ्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाचं सर्वत्र खूप कौतुक होत आहे. अलीकडेच, बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलनेही हा चित्रपट पाहिला आणि त्यावर त्याने रिव्यू दिला.

विकी कौशलने केलं कौतुक 
विकी कौशलने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत लिहिलं, 'चित्रपटाकडे पाहिलं. कॅप्टन बत्रा यांचं शौर्य आणि त्याग पाहून माझे अश्रू वाहू लागले. सर्व सैनिकांना माझा सलाम. मला शेरशाहच्या संपूर्ण टीमचं कौतुक करायला आवडेल. याशिवाय विक्की कौशलने त्याच्या पोस्टमध्ये चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक आणि सिद्धार्थ-कियारा यांची नावे नमूद केली आहेत.

चित्रपट पाहिल्यानंतर भावनिक झाला
विकी कौशलने सिद्धार्थसाठी विशेष उल्लेख करत लिहिलं, 'सिद्धार्थ मल्होत्रा ​​या चित्रपटासोबत तुमचा प्रवास खूप मोठा आहे आणि तु त्याला पात्र आहेस. तुम्ही अप्रतिम काम केलं भाऊ. आणि कियारा अडवाणी तु तर फक्त एका रडवून मानशील. खूप छान काम केलंस. तुम्ही हा चित्रपट जरूर पाहा कारण ये दिल मांगे मोरे.'