'पाश्चिमात्य देशांकडे खरे सुपरहिरो...', संभाजी महाराजांबद्दल कौतुक करताना विकी कौशलचं मोठं विधान, नेटकरी म्हणाले...

Vicky Kausal on Chhatrapati Sambhaji Maharaj: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) 'छावा' (Chhava) चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून विकी कौशलचा अभिनय पाहून सर्वजण भारावले आहेत.     

शिवराज यादव | Updated: Aug 20, 2024, 07:18 PM IST
'पाश्चिमात्य देशांकडे खरे सुपरहिरो...', संभाजी महाराजांबद्दल कौतुक करताना विकी कौशलचं मोठं विधान, नेटकरी म्हणाले... title=

Vicky Kausal on Chhatrapati Sambhaji Maharaj: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) 'छावा' (Chhava) चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारणार आहे. मागील अनेक दिवसांपासून विकी कौशलच्या चित्रपटाची चाहत्यांनी प्रतिक्षा लागली होती. अखेर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून विकी कौशलचा अभिनय पाहून सर्वजण भारावले आहेत. 19 ऑगस्टला टीझर रिलीज झाला आहे. दरम्यान टीझर रिलीजच्या कार्यक्रमात विकी कौशलने केलेल्या एका विधानाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची तुलना अॅव्हेंजर्सशी केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विकी कौशल म्हणाला की, "तुम्ही भारताचा इतिहास पाहिलात तर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे इतके सुपरहिरो आहेत की त्यांच्यासमोर सर्व सुपरहिरो फेल ठरतील. आपण इतिहासातील अशा गोष्टी लोकांना दाखवणं फार गरजेचं आहे. आपण एकत्रित हे सेलिब्रेट केलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो की, पश्चिमेकडे अॅव्हेंजर्स बनवण्याची गरज पडते कारण त्यांच्याकडे आपल्यासारखे सुपरहिरो नाहीत. आपल्याकडे खऱे सुपरहिरो आहेत".

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

चाहत्यांकडून विकी कौशलचं कौतुक

विकी कौशलच्या या विधानाने चाहते भारावले असून त्याचं कौतुक करत आहेत. एका चाहत्याने इंस्टाग्रामला कमेंट करत म्हटलं आहे की, विकी तुझ्या अभिनयाच्या आसपास कोणीही येऊ शकत नाही'. यावेळी त्याने फायर इमोजी वापरली आहे. दुसऱ्या चाहत्याने, सर्वात सुंदर विधान असं म्हटलं आहे. 'भारताचा इतिहास आणि पौराणिक कथा सर्वोत्तम आहेत', अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तसंच एकाने आता तो खरा सुपरहिरो होईल असं म्हटलं आहे. 

छावा चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून रश्मिका मंधाना येसूबाई भोंसलेच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय, अक्षय खन्ना मुघल सम्राट औरंगजेब, आशुतोष राणा सरसेनापती हंबीराव मोहिते आणि दिव्या दत्ता सोयराबाईंच्या भूमिकेत आहेत. नील भूपालम आणि संतोष जुवेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मॅडॉक फिल्म्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.