मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळानं निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लालन सारंग यांनी शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झाले. लालन सारंग यांच्या अभिनय प्रवासात ‘सखाराम बाईंडर’ नाटक मैलाचा दगड ठरले. या नाटकातील त्यांनी साकारलेली ‘चंपा’ ही भूमिका कलाकार म्हणून त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतीच, पण ती जगण्याचे नवे भान देणारी होती. स्वत:चे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलून गावंढळ, रांगडी आणि बिनधास्त ‘चंपा’ साकारणे हे एक आव्हान होते आणि ते त्यांनी यशस्वीपणे पेलले.
लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार मिळाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. २००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७ व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार
- पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार
- २००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७ व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षपद
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार
आक्रोश (वनिता)
आरोप (मोहिनी)
उद्याचा संसार
उंबरठ्यावर माप ठेविले
कमला (सरिता)
कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय)
खोल खोल पाणी (चंद्राक्का)
गिधाडे (माणिक)
घरकुल
घरटे अमुचे छान (विमल)
चमकला ध्रुवाचा तारा
जंगली कबुतर (गुल)
जोडीदार (शरयू)
तो मी नव्हेच
धंदेवाईक (चंदा)
बिबी करी सलाम
बेबी (अचला)
मी मंत्री झालो
रथचक्र (ती)
राणीचा बाग
लग्नाची बेडी
सखाराम बाइंडर (चंपा)
संभूसांच्या चाळीत
सहज जिंकी मना (मुक्ता)
सूर्यास्त (जनाई)
स्टील फ्रेम