जेव्हा 'अंग्रेजों के जमाने का जेलर' पळून मुंबईत आला, आणि असं नशीब खुललं

असरानी सिनेसृष्टीत जाण्यासाठी बर्‍याचदा शाळेतून पळून जायचे.

Updated: May 13, 2021, 10:05 PM IST
जेव्हा 'अंग्रेजों के जमाने का जेलर' पळून मुंबईत आला, आणि असं नशीब खुललं title=

मुंबई : कॉमेडियन, अभिनेता आणि दिग्दर्शक असरानी 1 जानेवारी 1941 रोजी पंजाबमधील गुरदासपूरमध्ये त्यांचा जन्म झाला. असरानी यांनी अभिनयातील एबीसीडी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये शिकले. गोवर्धन असरानी असं त्याचे पूर्ण नाव आहे. चला जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही किस्से...

एका मुलाखतीदरम्यान असरानी म्हणाले होते की, त्यांचे चित्रपटांशीचे संबंध लहानपणापासूनच होते. सिनेसृष्टीत जाण्यासाठी ते बर्‍याचदा शाळेतून पळून जायचे. हे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आवडायचं नाही आणि त्यांनी त्यांच्या सिनेमावर निर्बंध लादले. त्यांनी मोठं व्हावे आणि सरकारी नोकरी करावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. जसं वय वाढलं तसं त्यांचं चित्रपटांशी असलेले आकर्षण त्यांची आवड बनू लागलं आणि एक दिवस असरानी कोणालाही काहीच न सांगता गुरदासपूरहून मुंबईला पळून गेले.

असा मिळाला पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश
मुंबईत आल्यानंतर त्यांनी फिल्म लाईनमध्ये अनेक महिने संघर्ष केला, पण ते यशस्वी होवू शकले नाही. इथे एकाने त्यांना सांगितलं की, चित्रपटांत एन्ट्री घ्यायची असेल तर पुणे फिल्म इन्स्टिट्यूट मधून डिप्लोमा करावा लागेल. 1960 मध्ये  पुण्यात फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था स्थापन झाली. न्यूजपेपरमध्ये एक्टिंग कोर्सच्या पहिल्या बॅचसाठी अभिनयात डिप्लोमाची बातमी पाहिल्यानंतर असरानी यांनी अर्ज केला. त्यांची निवडही झाली. 1964मध्ये त्यांनी अभिनयात डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली.

जेव्हा घरच्यांनी मुंबईहून पुन्हा घरी नेलं
पुण्याहून डिप्लोमा घेऊन मुंबईला परतलेल्या आसरानी यांना चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका मिळाल्या, पण 'सीमा' चित्रपटाच्या गाण्यामुळे त्यांना पहिल्यांदाच ओळख मिळाली. जेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी असरानी यांना या गाण्यामध्ये पाहिलं तेव्हा ते थेट मुंबईत आले आणि त्यांना गुरदासपूरमध्ये  परत घेवून गेले. काही दिवस गुरदासपूरात राहिल्यानंतर कुटुंबाला कसा तरी पटवून ते पन्हा मुंबईत परतले.

यानंतर बऱ्याच दिवसांपासून मुंबईत काम शोधूनही त्यांना कोणतीही भूमिका मिळाली नाही, त्यानंतर ते पुन्हा पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये परतले आणि एफटीआयआयमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करु लागले. यावेळी ते अनेक चित्रपट निर्मात्यांच्या संपर्कात आले. 1969 साली आलेल्या 'सत्यकाम' या चित्रपटाच्या वेळी त्यांना मोठा ब्रेक मिळाला होता, परंतु 1971 साली आलेल्या 'गुड्डी' चित्रपटातून तो लाईमलाईटमध्ये आले. त्यांना या चित्रपटात एक गंमतीदार भूमिकाही मिळाली, जी केवळ प्रेक्षकांना आवडला नाही, तर असरानी यांना विनोदकार म्हणूनही टॅग लागला.

अमिताभ यांच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. यांत अभिमान १९७३, 'चंदर' आणि 'चुपके चुपके' १९७५, यानंतर १९७५ मध्ये त्यांनी साकारलेली नागेश शास्त्रीची व्यक्तिरेखा हीरोपेक्षा कमी नाही. 'शोले' मधील एक डायलॉग बोलून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात असरानी यशस्वी ठरले होते. 'अंग्रेजों के जमाने के जेलर' हा डायलॉग असरानी यांची ओळख बनली आहे.