Nasruddin Shah and Ratna Patak Shah: बॉलिवूडमध्ये लग्नसभारंभ हे अत्यंत थाटात साजरे केले जातात. यावेळी त्यांच्या लग्नसभारंभांना (Most Expensive Weddings of Bollywood) महागडे कपडे, आलिशान लग्नाचा सेट, पाहुण्यांची चंगळ आणि विविध रंगतदार, चविष्ट पदार्थांची रांग असते. त्यामुळे ही बॉलिवूडची अशी हायफाय लग्नं कायमच चर्चेत असतात. परंतु बॉलिवूडमध्ये असेही काही कपल आहेत ज्यांनी फारच कमी पैशांमध्ये आणि साध्यासुध्या पद्धतीनं लग्नगाठ बांधली आहे. आजकाल अशा कलाकारांविषयीही लिहिलं आणि बोललं जात आहे. कमी पैशांत आणि कसलाही तामझाम न करता लग्न संपन्न केल्याबद्दल त्यांच्या अनेक चाहते त्यांचे अभिनंदनही करतात.
या लेखातूनही आम्ही तुम्हाला अशाच एका कपलबद्दल सांगणार आहोत. सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे नसिरूद्दीन शहा यांची. ते अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आताही ते चर्चेत आले आहेत. परंतु तुम्हाला त्यांची आणि रत्ना पाठक शहा यांची लव्ह स्टोरी माहिती आहे का? त्यांनी आपल्या लग्नात कुठलाही अवाजवी खर्च केला नाही आणि सोबतच त्यांनी कोर्ट मॅरेज करत लग्नाचे पारंपारिक रीतीरिवाजही पाळले नाहीत. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चांगली चर्चा राहिली होती. धर्मांचं बंधन झुगारून या बॉलिवूड कपलनं लग्नगाठ बांधली आहे. तेव्हा त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रेमकहाणीविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की नसिरूद्दीन शहा आणि रत्ना पाठक शहा हे उत्तम बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री आहेतच परंतु त्याचसोबत ते सर्वात्कृष्ट नाटककारही आहेत. त्या दोघांनी एकत्र अनेक नाटकांमधून काम केलं आहे. त्यांनी एकत्र अभिनय केलेलं 'आईनस्टाईन' हे नाटकही बरेच गाजले. त्यांना पहिल्या नजरेत अन् पहिल्या मुलाखतीत (Love at Second Sight) प्रेम झाले नाही. तर दुसऱ्या भेटीदरम्यान त्यांचे एकमेकांवर प्रेम बसले, अशी त्यांच्या लग्नाची आठवण आहे. त्यांची भेट ही सत्यदेव दुबे यांच्या नाटकादरम्यान झाली होती.
हेही वाचा - निळू फुलेंच्या लेकीचा NCP मध्ये प्रवेश! म्हणाल्या, "माझ्या वडिलांच्या विचारांना..."
अभिनेत्री रत्ना पाठक शहा आणि नसिरूद्दीन शहा यांनी 1 एप्रिल 1982 साली त्यांनी लग्न केले होते. परंतु त्याआधी ते लिव्ह इनमध्येही (Live in Relationship) होते आणि त्यांनी एकमेकांना डेटही केलं होतं. त्यांना आता दोन मुलंही आहे आणि गेली चाळीस वर्षे ते एकमेकांसोबत आहे. रत्ना पाठक शहाही आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते. त्याचसोबत त्यांनी आपल्या लग्नाचा दिवस खूप एन्जॉय केला होता. त्यांच्या लग्नाला रत्ना पाठक शहा यांची आईही उपस्थित होती.