ऋषी कपूर पुन्हा रुग्णालयात दाखल

रणबीरसह आलियाचीनेही घेतली रुग्णालयात धाव   

Updated: Feb 3, 2020, 08:22 AM IST
ऋषी कपूर पुन्हा रुग्णालयात दाखल title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर Rishi Kapoor यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही महिन्यांपूर्वीच ते परदेशातून उपचार घेऊन मायदेशी परतले होते. पण, आता त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वाचावरण आहे. 

रविवारी कपूर यांना अचानक प्रकृती बिघडल्यामुळे तातडीने दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू कपूर यासुद्धा रुग्णालयात आहेत. ऋषी कपूर यांच्या तब्येतीविषयी माहिती मिळताच त्यांचा मुलगा, अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री आलिया भटट् यांनीसुद्धा थेट रुग्णालय गाठलं. 

'पीटीआय' या वृत्तनाहिनीच्या वृत्तानुसार कपूर यांना एक संसर्ग झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्याविषयी खुद्द ऋषी यांनीच वृत्तसंस्थेला माहिती देत मला असणाऱ्या संसर्गावर उपचार सुरु आहेत. चिंतेची काही बाब नसल्याचं सांगितलं आहे. दिल्लीतील प्रदूषणामुळे हे झाल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. सध्याच्या घडीला त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

काही महिन्यांपूर्वीच ऋषी कपूर यांनी कॅन्सरवर मात करत ते परदेशातून परतले होते. बरेच महिने न्यूयॉर्कमध्ये या आजारावर उपचार घेतल्यानंतर ते स्वगृही परतले. यादरम्यान पत्नी नीतू या त्यांच्यासोबतच होत्या. शिवाय रणबीर आणि आलियासुद्धा त्यांची भेट घेण्यासाठी वारंवार जात असत. आजाराशी झुंज देत पुन्हा एकदा कलाविश्वात अनोख्या अंदाजात परतणारे ऋषी कपूर येत्या काळात अभिनेत्री दीपिका पदुकोण हिच्यासोबत झळकणार आहेत.