सलमान खानने या अभिनेत्रीला मोठ्या आजारातून वाचवलं

कोण आहे ही अभिनेत्री 

सलमान खानने या अभिनेत्रीला मोठ्या आजारातून वाचवलं  title=

मुंबई : सलमान खानसोबत काम करणाऱ्या अभिनेत्री कायमच चर्चेत असतात. कधी त्यांच्या कामामुळे तर कधी त्याची कारण खूप वेगळी असतात. अशीच एक अभिनेत्री तिच्या आजारपणामुळे चर्चेत आली आहे. याचं कारण असं की सलमान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला एका आजाराने ग्रासल. आणि या आजारावर उपचार करण्यासाठी तिच्याकडे पैसे देखील नव्हते. एवढंच काय तर या अभिनेत्रीला तिच्या आजारपणामुळे नवऱ्याने आणि कुटुंबियांनी एकटं सोडलं होतं. मात्र अशावेळी तिच्यासाठी चक्क सलमान खान धावून आला. 

सलमान खानची ही अभिनेत्री आहे पूज डडवाल. जेव्हा सलमान खानला पूजाच्या या अवस्थेबद्दल कळलं तेव्हा तो तिच्यासाठी धावून गेला. कित्येक दिवस पूजा टीबी आणि फुफ्फुसाच्या आजाराशी 2 हात करत आहे. एवढंच काय या आजारात तिची तब्बेत खूप खराब झाली आहे. यासाठी सलमान खानने सर्वोतोपरी मदत केली आहे. 

पूजा जेव्हा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन गोव्यात गेली. तेव्हा तिने आपली सगळी व्यथा एका वृत्तपत्राकडे मांडली. या अवस्थेत ती डिप्रेशन आणि आजारात आणखी गुंतत गेली होती. भरपूर खोकला आणि श्वासाचा आजार तिला आणखी त्रास देऊ लागला. पण या सगळ्या परिस्थितीत तिला अभिनेता सलमान खाननेच मदत केली आहे.