मुंबई : व्यवसाय कोणताही असला तरी त्यामध्ये चढ उतार होणं हे अटळ असतं.
सिनेसृष्टीदेखील त्याला अपवाद नाही. भारतामध्ये अनेक कलाकारांना दैवताप्रमाणे मानलं जातं. पण तरीही काही वेळेस चित्रपट बॉक्सऑफिसवर अपेक्षित कमाल करू शकत नाही.
आज बॉलिवूडमध्ये 'खान' कुटुंबीयांचं अधिराज्य आहे. मात्र कोटींच्या क्लबमध्ये राहूनदेखील अनेकांना बॉक्सऑफिसवर 'फ्लॉप' चित्रपट असा ठप्पा बसतो. परंतू या शर्यतीमध्ये दोन अशा तरूणांचं नाव आहे ज्यांनी अजूनही 'फ्लॉप' किंवा अपयश पाहिलं नाही.
दिग्दर्शक डेविड धवन यांचा मुलगा वरूण धवन हा बॉलिवूडमधील आघाडीच्या तरूण कलाकारांपैकी एक आहे. 2012 साली धर्मा प्रोडक्शनच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केलं. आजातागायत वरुणने 9 चित्रपट केले आहेत. मात्र अजूनही त्याच्यावर 'फ्लॉप' चा ठपका बसलेला नाही.
शाहरूख खानच्या ' माय नेम इज खान' या चित्रपटाचा तो असिस्टंट डिरेक्टर होता. सध्या वरूण धवन अनुष्का शर्मासोबत 'सुई धागा' चित्रपटामध्ये काम करत आहे.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अल्लू अर्जुन हा लोकप्रिय अभिनेता आहे. आजतागायत अल्लू अर्जुनने एकही फ्लॉप सिनेमा दिलेला नाही.
2003 साली अल्लू अर्जुनने गंगोत्री या चित्रपटातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. 23 चित्रपट केल्यानंतरही अजून एकदाही त्याने अजून 'फ्लॉप' चित्रपट पाहिला नाही.