वरुण धवन - आलिया भट्ट नंबर वन!

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर अभिनेत्यांच्या यादीत 12.52 गुणांसह वरूण ‘युथफुल’ अभिनेत्यांमध्ये आघाडीवर आहे. तर आलिया भट 76.22 गुणांसह ‘युथफुल’ अभिनेत्रींमध्ये नंबर वन आहे.  

Updated: Apr 18, 2018, 04:13 PM IST
वरुण धवन - आलिया भट्ट नंबर वन! title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता वरूण धवनची त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ऑक्टोबर' चित्रपटामुळे सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. म्हणूनच कदाचित ह्या आठवड्याच्या 'स्कोर ट्रेड्स इंडिया'च्या यादीत वरूणने पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होण्याचा मान पटकावला आहे. वरूण अभिनेत्यांच्या यादीत नंबर वन ठरला आहे. तर तरूणाईवर सध्या अधिराज्य करणारी आलिया भट नंबर वन अभिनेत्री ठरली आहे.

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी 'स्कोर ट्रेन्ड्स इंडिया'द्वारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर अभिनेत्यांच्या यादीत 12.52 गुणांसह वरूण ‘युथफुल’ अभिनेत्यांमध्ये आघाडीवर आहे. तर आलिया भट 76.22 गुणांसह ‘युथफुल’ अभिनेत्रींमध्ये नंबर वन आहे.  

'ऑक्टोबर' चित्रपटाबद्दल आणि त्यातल्या वरूणच्या भूमिकेबद्दल सध्या फेसबुक, ट्विटर आणि व्हायरल न्यूज सारख्या सोशल मीडियावर भरपूर लिहीलं जातंय... तर आलिया भटच्या 'राजी' सिनेमाचा सध्या फर्स्ट लूक आऊट झाला आहे. ह्या सिनेमात ती गुप्तहेराच्या भूमिकेत असल्याने चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे.

त्यामुळेच तर बॉलीवूड हार्टथ्रोब वरूण पहिल्या क्रमांकावर तर  रणवीर सिंह दुसऱ्या स्थानी, सिद्धार्थ मल्होत्रा तिसऱ्या स्थानी आणि टाइगर श्रॉफ चौथ्या स्थानावर आहे.

त्याचप्रमाणे आलिया आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दीपिका पादुकोणमध्ये 38 गुणांचं अंतर आहे. तिसऱ्या स्थानावर सोनाक्षी आणि चौथ्या स्थानावर सोनम कपूर आहे.

ह्याविषयी अश्वनी कौल सांगतात, 'आलियाची युवापिढीवर भुरळ आहे. ती जे काही करते त्याविषयी जाणून घेण्यात तरूणाईला रस आहे. आलिया भट आपल्या सिनेमामूळे गेल्या काही दिवसांमध्ये मीडिया पब्लिकेशन्स आणि सोशल मीडियावर सतत चर्चेत होती. म्हणूनच ती स्कोर ट्रेंड इडियावर नंबर वन झाली आहे.'

अश्वनी कौल पुढे म्हणतात, 'आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते... आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो'.