Vijay Varma नं Valentine Day च्या निमित्तानं 'या' Actress सोबतचं रिलेशन केलं जगजाहीर, पाहा व्हायरल फोटो...

Vijay Varma नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधान आलं आहेत. त्यानं आज व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एक फोटो शेअर केला आहे. 

Updated: Feb 14, 2023, 06:58 PM IST
Vijay Varma नं Valentine Day च्या निमित्तानं 'या' Actress सोबतचं रिलेशन केलं जगजाहीर, पाहा व्हायरल फोटो... title=

Valentine's Day Tamanna and Vijay : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) आणि विजय वर्मा (Vijay Varma) यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा केला जात आहे. हे कपल अनेकदा मीडियासमोर एकत्र पोज देताना दिसत आहे. मात्र, आतापर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काही वक्तव्य केलेलं नाही किंवा दुजोरा दिलेला नाही. परंतु आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विजय वर्मानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी स्वत: या बातमीवर शिक्कामोर्तब  केला आहे. 

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत, तर काही सेलिब्रिटी आपले प्रेम व्यक्त करण्यापासून स्वतःला दूर ठेवू पाहत आहेत. या सगळ्यामध्ये अभिनेता विजय वर्माने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

Valentine s Day special Tamannaah Bhatia and Vijay Varma relationship

विजयनं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये एका बाजूला जिथे विजयचा पाय दिसत आहे, तर दुसऱ्या बाजूला दिसणारा पाय तमन्नाचा असल्याचे म्हटले जात आहे. दोघांच्या पायांच्या मध्ये लाल रंगाचा हार्ट इमोजी देखील दिसत आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर लोकांनी दोघांमधील प्रेमाचा अंदाज येऊ लागला आहे.

Valentine s Day special Tamannaah Bhatia and Vijay Varma relationship

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल ती या फोटोत दिसणारे शूज तमन्नाचे आहेत याचा पुरावा नेटकऱ्यांकडे काय आहे? तर या फोटोत दिसणाऱ्या शूजचे पुरावेही नेटकाऱ्यानी शेअर केले आहेत. खालील फोटोत तुम्ही पाहू शकता की तमन्नाचे शूज विजयने शेअर केलेल्या आजच्या पोस्टमध्ये दिसलेल्या शूजशी जुळताना दिसत आहेत. अनेक नेटकरी अंदाज बांधत आहेत की अभिनेत्रीने जॅकेट हातात धरले आहे. तमन्नाचे हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. यानंतर नेटकरी ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हणत आहेत. 

हेही वाचा : Kiara - Sidharth Malhotra Haldi Photos: व्हॅलेंटाईन डे निमित्तानं कियारानं शेअर केले हळदीचे Unseen Photo

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा नुकतेच एका अवॉर्ड शोमध्ये एकत्र पोज देताना दिसले होते, त्यानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, तमन्ना आणि विजय यांनी त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा दुजोरा दिलेला नाही.