Javed Khan Amrohi Death: बॉलिवूड अभिनेता जावेद खान अमरोही (Javed Khan Amrohi) यांचे निधन झाले आहे. जावेद खान अमरोही यांचे वय फक्त 50 वर्षे होते. जावेद खान अमरोही यांनी जवळपास 150 चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय टीव्हीच्या दुनियेतही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. जावेद खान अमरोही यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेली नाही. (Javed Khan Amrohi Death News) जावेद खान अमरोही यांच्या निधनाचे नक्की कारण काय आहे असा सवाल त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.
जावेद खान अमरोही यांना 2001 मध्ये आलेल्या 'लगान' (Lagaan) चित्रपटातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेसाठी अकादमी पुरस्कारासाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. याशिवाय 'अंदाज अपना अपना' आणि 'चक दे इंडिया' मधील त्यांच्या अभिनयानं सगळ्यांना भूरळ पाडली होती. त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक सुरु होते. जावेद खान यांनी 'मिर्झा गालिब' या टीव्ही सीरियलमध्येही काम केले होते. जावेद खान अमरोही यांनी जी इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट्समध्ये फॅकल्टी म्हणून काम केले. जावेद खान अमरोही यांच्या निधनाची बातमी 'चंद्रकांता'चे अखिलेंद्र मिश्रा यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत दिली. त्यांनी केलेल्या या पोस्टनंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. (Javed Khan Amrohi Woked In These Movies)
जावेद खान अमरोही यांचा जन्म मुंबईत झाला. जावेद खान अमरोही हे बॉलिवूडमध्ये सहाय्यक भूमिकांसोबतच अनेक चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील साकारली आहे. जावेद खान अमरोही यांनी जवळपास 150 हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या वेगवेगळ्या भूमिक साकारल्या. या सगळ्या भूमिकांनी जावेद खान अमरोही यांनी त्यांच्या चाहत्यावर छाप सोडली होती. अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), परेश रावल (Paresh Rawal) आणि सुनील शेट्टी (Sunil Shetty) स्टारर 'फिर हेरा फेरी' (Phir Hera Feri) या चित्रपटात पोलीस हवालदाराची भूमिका करून त्याने सर्वांना हसवून सोडले होते.
दरम्यान, जावेद खान अमरोही यांच्या निधनाची बातमी मिळताच सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या कुटुंबाच्या शोकात सामिल असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आठवल्याचे सांगितले.