मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेती (Naional Award Winner) अभिनेत्री उषा जाधव (Usha Jadhav) हिने 'माई घाट: क्राईम नं103/2005” (Mai Ghat) या सिनेमासाठी एनवायसी दक्षिण आशियाई फिल्म फेस्टिवल(न्यूयॉर्क)(New Yrok) येथे ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार’ जिंकून महाराष्ट्राची मराठमोळी अभिनेत्री साता समुद्रापार पोहोचली आहे.
'माई घाट' एक बायोपिक सिनेमा आहे. ज्यामध्ये एका आईच्या एकुलत्या एक मुलाला पोलिसांकडून छळ करून ठार मारले जाते. आपल्या मुलाच्या मृत्युनंतर त्याला न्याय मिळावा याकरता अनेक दशकांहून अधिक काळ या माऊलीने केलेल्या संघर्षाची ही खरी कहाणी आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन असून मोहिनी गुप्ता या त्याच्या निर्माता आहेत.
Pleasured to be part of a prestigious 63rd Seminci Valladolid International Film Festival (Spain) closing gala... #RedCarpet #GreenCarpet @SEMINCI #Seminci Costume by @esthernoriega Hair & Make up by Laura & Nani pic.twitter.com/2EWmA1ftwJ
— usha jadhav (@ushajadhav) October 29, 2018
अभिनेत्री उषा अलीकडेच अरुणा राजे यांच्या फायरब्रँडमध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिने वकिलाची भूमिका साकारली होती. सध्या दोन आंतरराष्ट्रीय सिनेमांवर ती काम करत आहे. असाच एक प्रकल्प वेन्टुरा पन्स यांचा आहे. ज्यामध्ये अभिनेत्री उषा एका भारतीय मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. तो एक नृत्य आणि संगीतमय सिनेमा असून अभिनेत्री उषाने त्यामध्ये स्वतः एक गाणे देखील गायले आहे.
Happy to share that MAI GHAT: crime no:103/2005 won
Best Actress : Usha Jadhav
Best Director : Anant Mahadevan at
NYC South Asian Film Festival!!!
Heartiest congratulations to the team #MaiGhat !!!
Thank you @nycsaff ! #MohiniGupta @ananthmahadevan #UshaJadhav #NewYork pic.twitter.com/vtSVWl8jKk— usha jadhav (@ushajadhav) November 18, 2019
त्याचबरोबर स्पॅनिश दिग्दर्शक एलेजांड्रो कॉर्टिस यांच्यासह आणखी एक स्पॅनिश चित्रपट ती करीत आहे. अपार कष्ट आणि मेहनतीने यशाची शिखरे गाठून उषाने मराठी मनाचे नाव उंचावले हि खरी वाखाणण्याजोगी गोष्टच म्हणावी लागेल.उषा जाधव मराठी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा आहे. 'ट्रॅफिक सिग्नल' या मधुर भंडारकर यांच्या सिनेमातून उषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2012 मध्ये 'धग' या मराठी सिनेमाला उषाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.