फिल्मफेअर 2018 मध्ये 'या' ड्रेसवरून उर्वशी रौतेला झाली ट्रोल

अवॉर्ड शो दरम्यान अनेक स्टार्स त्यांचा फॅशन जलवा दाखवण्यासाठी खास ड्रेस डिझाईन करून घेतात. नुकताच बॉलिवूडचा बहुप्रतिष्ठित अवॉर्ड शो म्हणजेच फिल्मफेअर 2018 रंगला. 

Updated: Jan 22, 2018, 07:36 PM IST
फिल्मफेअर 2018 मध्ये 'या' ड्रेसवरून उर्वशी रौतेला झाली ट्रोल  title=

मुंबई : अवॉर्ड शो दरम्यान अनेक स्टार्स त्यांचा फॅशन जलवा दाखवण्यासाठी खास ड्रेस डिझाईन करून घेतात. नुकताच बॉलिवूडचा बहुप्रतिष्ठित अवॉर्ड शो म्हणजेच फिल्मफेअर 2018 रंगला. 

सेलिब्रिटींची मांदियाळी 

बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी फिल्मफेअर 2018 मध्ये उपस्थिती लावली होती, दरम्यान या अवॉर्डशोमध्ये उर्वशी रौतेला ही अभिनेत्री काळ्या गाऊनमध्ये आली होती. उर्वशीच्या ड्रेसचं डिझाईन पाहून काही नेटकर्‍यांनी तिची खिल्ली उडवली. 

उर्वशीच्या ड्रेसची निवड आणि पॅटर्नवरून उर्वशी ट्रोल झाली, अनेकांनी तिला फॅशनस्टाईल बदलण्याचा सल्ला दिला आहे. फिल्मफेअर पार्टीत रणवीर सिंहने असा ड्रेस का घातला ?

उर्वशी झाली ट्रोल  

लवकरच 'हेट स्टोरी 4' या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणारी उर्वशीच्या सोशल मीडियावरील फोटोंवर नेटकर्‍यांनी तिची टर उडवणार्‍या कमेंट्स लिहल्या आहेत. 

उर्वशीने इंस्टाग्रामवर तिचा खास फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तिच्या ड्रेस डिझायनरच्या नावाचाही उल्लेख केला होता. 'हेट स्टोरी 4' या चित्रपटातील बोल्ड अंदाजही तिने यामध्ये लिहला होता. 

 

कधी येणार 'हेट स्टोरी 4'  

'हेट स्टोरी 4' चा पहिला लूक काही दिवसांपूर्वी चाहत्यांसमोर आणला आहे. हा चित्रपट 9 मार्च रोजी  प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. ही गोष्ट खूपच क्लेषकारक आहे.