कॅमेरासमोर पोज देताना घसरला अभिनेत्रीचा ड्रेस, उर्वशी रौतेलाचा Oops Moment कॅमेरात कैद

उर्वशी रौतेला तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

Updated: Jan 25, 2022, 07:58 PM IST
कॅमेरासमोर पोज देताना घसरला अभिनेत्रीचा ड्रेस, उर्वशी रौतेलाचा Oops Moment कॅमेरात कैद title=

मुंबई : उर्वशी रौतेला तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री नेहमीच ग्लॅमरस पद्धतीने मीडियाशी संवाद साधते. पण अनेकवेळा उर्वशी तिच्या स्टायलिश ड्रेसमुळे Oops Moment ची शिकारही ठरते. उर्वशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका शोदरम्यान उर्वशी अतिशय स्टायलिश अंदाजात दिसली होती. मात्र मीडियासमोर पोज देताना तिचा ड्रेस घसरला. आणि यामुळे ती Oops Moment ची शिकार झाली.

उर्वशी रौतेला ठरली Oops Moment ची शिकार
उर्वशी ड्रेस फिक्स करत असताना त्याचवेळी उर्वशीचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. हा एक टीव्ही शो होता. ज्यामध्ये उर्वशी रौतेलासोबत अंकिता लोखंडे दिसली होती.

उर्वशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांशी ती नेहमीच जोडलेली राहते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बाथरूमधून एक  मिरर सेल्फी शेअर केला होता. उर्वशीची ही इंस्टाग्राम पोस्ट तुफान  व्हायरल झाली आहे. ज्यात तिची स्टाईल पाहण्यासारखी होती. उर्वशीच्या या फोटोवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत आणि कमेंटही करत आहेत.

उर्वशी रौतेलाने 'सिंह साहेब द ग्रेट' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात ती सनी देओलसोबत दिसली होती. ज्यामध्ये तिचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं होतं. याशिवाय तिने 'लव्ह डोस', 'लाल दुपट्टा', 'बिजली की तार', 'एक लडकी भीगी भागी सी', 'डूब गए' आणि 'वो चांद कहाँ से लगी' असे अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत. उर्वशी रौतेला लवकरच 'ब्लॅक रोज' या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे.