Urfi Javed Trolled: उर्फी जावेद तिच्या बोल्ड अदांजाने नेहमीच चाहत्यांना भूरळ पाडते. अनेकांना तिचे नवीन लूक (look) आवडतात. तिच्या लूकची प्रचंड चर्चा केली जाते. तर काही लोक तिच्या लूकवर जबरदस्त तिला ट्रोल (Troll) करतात पण त्या ट्रोलर्सना भिक न घालता ती नेहमीच भल्याभल्यांना तिच्या लूकने चिंतेत पाडते. तिने या वेळेस हेट कमेन्ट्सना (Hate Comments) जास्त महत्त्व दिले नाही उलट चतूरतेने त्या ट्रोलर्सना (Troller's) उत्तर देऊन त्यांची बोलती बंद केली. एका वाक्यात उर्फीनं ट्रोलर्सची मुस्की आवळली. नेमकं असं घडलं तरी काय चला जाणून घेऊ.. (Urfi Javed Trolled for her Latest Bralette look NZ)
उर्फी तिच्या ब्रालेट लूकमुळे ट्रोल
उर्फीला तिच्या नवीन लूकमध्ये मुंबई एयरपोर्टवर (Mumbai Airport) पाहण्यात आले होते. ज्यात तिने निळ्या रंगाचा एक ब्रालेट आणि छोटा स्कर्ट (Skirt) घातला होता. अनेकांना तिचा हा लूक आवडला तर अनेकांनी त्याच लूकची थट्टा केली आणि मग ट्रोल देखील केले. काही ट्रोलर्सना तर उर्फीने सोशल मीडियावर (Social Media) स्वत: उत्तर दिले आणि काहींचे स्क्रीनशॉट्स (Screenshots) तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकांउटवर शेअर (Share) केले.
उर्फीचा ब्रालेट लुक पाहून एका युजर्सने कपडे द्यायचे केले वचन
ट्विटरवर (Twitter) एका युजर्सने उर्फीला टॅग (Tag) करत सांगितले की, "तुम्हाला कपड्यांची गरज आहे का? आम्ही एक एनजीओ (NGO) चालवतो आणि तुम्हाला आरामात कपडे पाठवू शकतो." "ज्या लोकांची कपडे खरेदी करायची ऐपत नाही अशांना आम्ही मदत करतो आणि म्हणूनच तुम्हालाही मदत करायला आवडेल". 'मी विनंती (Request) करतो की मीडियीने उर्फीला इतकं महत्त्व देणं बंद करावे'.
उर्फीचा एका वाक्याने केला अपमान
उर्फीने त्या यूजरला त्याच्या ट्वीट (Tweet) वर ही रिप्लाय (Reply) केले की, 'हो नक्की.. मला खूप आवडेल. तुम्ही माझ्यासाठी कपडे पाठवले तर आणि आता आपण एकमेकांची मदत करतच आहोत तर मला ही तुमचे नाक परत करायला आवडेल'.. 'माझ्या कामात तुम्ही नाक खुपसताना दिसत आहात'... उर्फी ने या स्टेटमेंटला (Statement) ट्रोलवाल्या ट्वीटसोबत इंस्टाग्राम वर देखील शेअर (Share) केले आहे. एका वाक्यात तिने त्या ट्रोलरला तोडांवर पाडले आणि सांगितले की, माझ्या कामात नाक घुसवायचा प्रयत्न करु नको...