मुंबई : कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून वातावरण चांगलचं तापलं आहे. याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. यावर अनेक सेलिब्रिटींनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आता 'बिग बोस ओटीटी' फेम अभिनेत्री उर्फी जावेदने देखील 'हिजाब' प्रकरणावर मोकळेपणाने भाष्य केलं आहे. उर्फी कायम तिच्या विचित्र कपडे आणि स्टाईलमुळे चर्चत असते. पण आता ती हिजाब प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.
माध्यमांसोबत संवाद साधताना हिजाबवर उर्फी म्हणते, 'महिला त्यांना हवे तसे कपडे घालू शकतात. महिलांचे कपडे त्यांचं शिक्षण ठरवू शकत नाही. मला कळत प्रत्येक शाळेचे नियम असतात. पण भारतात धर्म एक संवेदनशील विषय आहे...'
'महिला हिजाब घालत आहेत, तर त्या काही चूक करत नाहीत. प्रत्येकाला स्वतंत्र आहे. ज्या महिला हिजाब घालतात त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. मी लहानपणापासून हिजाब घातला नाही...'
उर्फी पुढे म्हणते, 'माझ्या आईने देखील कधी हिजाब घातला नाही. पण माझी आजी घालायची. माझे नातेवाईक देखील घातलाल, ती त्यांची आवड आहे. माझ्या समाजातील लोकांनी माझा विरोध केला..'
'पण मी याठिकाणी लोकांना आनंदी ठेवण्यासाठी आलेली नाही... कोणाला माझ्याविरोधात फतवा जारी करायचा असेल तर करा... मला काही फरक पडत नाही...' असं देखील उर्फी म्हणाली...