नेहमीच ट्रोल होणाऱ्या उर्फीने असं काही केलं की लोकं म्हणाले, 'मोठ्या मनाची आहे.'

नेहमीच ट्रोलर्सच्या निशान्यावर असलेली उर्फी या एका कृतीमुळे चर्चेत. लोकांकडून होतंय कौतूक.

Updated: Oct 25, 2022, 08:53 PM IST
नेहमीच ट्रोल होणाऱ्या उर्फीने असं काही केलं की लोकं म्हणाले, 'मोठ्या मनाची आहे.' title=
Urfi javed help women

मुंबई : उर्फी जावेद (urfi Javed) सोशल मीडियावर तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीचे पपराजीसोबत खास नाते आहे. मंगळवारी उर्फी पारंपारिक लूकमध्ये दिसली. यावेळी तिने जांभळ्या रंगाचा ऑफ शोल्डर कुर्ता घातला होता आणि त्यावर नेटचा दुपट्टा घेतला होता. उर्फीने तेथे उपस्थित फोटोग्राफर्संना मिठाईचे वाटप केले.

उर्फीने सांगितले की, तिची प्रकृती ठीक नाही. तिला टायफॉइड (tified to Urfi javed) झाला आहे. यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. उर्फी पुढे म्हणते की, ती आता बरी आहे. यावेळी तिने तिथे उपस्थित फोटोग्राफर्सना मिठाईचे वाटप केले. यादरम्यान एक महिला देखील तिथे आली. उर्फीकडे ती पैसे मागत होती. उर्फीने महिलेला पैसे दिले आणि मिठाईचा बॉक्स देखील दिला. त्यानंतर ती गाडीत बसली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एका यूजरने व्हिडिओवर कमेंट केली की, काहीही झाले तरी ती मनाने मोठी आहे. यासाठी तिला खूप खूप प्रेम. एक व्यक्ती म्हणाला, लोक काहीही म्हणतील, पण जे सत्य आहे तेच सत्य आहे. हृदय चांगले आहे. शुद्ध हृदय. एकाने लिहिले, मुलगी मनाने चांगली आहे, चला काही गुण घेऊ. एक युजर म्हणतो, चांगली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

याआधी उर्फीने दिवाळीनिमित्त सेमी न्यूड व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यात तिने फक्त स्कर्ट घातला होता आणि समोरचा भाग हाताने झाकला होता. व्हिडिओमध्ये उर्फी लाडू खाताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले.