'बाहुबली'मधील महाराणी शिवगामी आणि नाना पाटेकरांचा तो किसिंग सीन व्हायरल

दाक्षिणात्य सिनेमा ते हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री रम्या कृष्णनचा जन्म 15 सप्टेंबर 1970 साली झाला. 

Updated: Sep 15, 2021, 07:23 PM IST
'बाहुबली'मधील महाराणी शिवगामी आणि नाना पाटेकरांचा तो किसिंग सीन व्हायरल title=

मुंबई : दाक्षिणात्य सिनेमा ते हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्री रम्या कृष्णनचा जन्म 15 सप्टेंबर 1970 साली झाला.  त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी अभिनयाच्या जगात काम करण्यास सुरुवात केली. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांबरोबरच त्या आतापर्यंत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसल्या आहेत.

राम्या कृष्णन तामिळ विनोदी कलाकार चो रामास्वामी यांची भाची आहे.  ज्यामुळे तिला चित्रपटांमध्ये सहज ब्रेक मिळाला. तिने 'वेल्लई मनसू' या तामिळ चित्रपटातून पदार्पण केलं. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी राम्याने साऊथच्या चारही भाषांमध्ये काम केलं होतं. त्यांनी 1993 मध्ये 'परमपारा' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, ज्यात आमिर खान महत्वाच्या भूमिकेत होता. यानंतर राम्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये सतत काम केलं.

किसींग सीन आले होते हेडलाईन्समध्ये
रम्या आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत  नाना पाटेकर 'वाजूद' चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात नाना पाटेकर आणि रम्या यांचे किसींग सीन होते. जे अभिनेत्रीने पडद्यावर निर्दोषपणे साकारले. त्या काळानुसार, नाना आणि रम्याच्या या सीनला बऱ्यापैकी बोल्ड म्हटलं गेलं.

'बाहुबली'ला जगभरात मान्यता
राम्याने 'बाहुबली'आधीच चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला होता. मात्र तिने 2015 आणि 2018 च्या चित्रपट' बाहुबली 'मधील' महाराणी शिवगामी 'चं पात्र साकारुन प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी यांच्या मुख्य भूमिका होत्या.