वडिलांच्या प्रेमाला तोड नाही... लेकीसह बिग बींचा फोटो व्हायरल

प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा मान, शान आणि सन्मान असतो. तिच्या आयुष्यातील तो सुपरहिरोच असतो.

Updated: Jun 27, 2019, 10:19 AM IST
वडिलांच्या प्रेमाला तोड नाही... लेकीसह बिग बींचा फोटो व्हायरल title=

मुंबई : प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा मान, शान आणि सन्मान असतो. तिच्या आयुष्यातील तो सुपरहिरोच असतो. असचं नातं बॉलिवूडचे महानायक अभिताभ बच्चन आणि त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा यांच्यात आहे. अभिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी शेअर केलेला हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

एक दिन ऐसी थी, और पता ही नहीं चला कब … ऐसी हो गयी 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांनी श्वेताचा बालपणाचा आणि आताचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'एक दिन ऐसी थी, और पता ही नही चला कब...ऐसी हो गई' असे लिहिले आहे.

बिग बी कधी त्यांच्या मुलीसह फॅशन शोमध्ये उपस्थित राहून तिचं मनोबळ वाढवतात. तर कधी सोशल मीडियावर तिच्यासोबतचे फोटो शेअर करतात. लहानपणी अशी असणारी कधी मोठी झाली कळालचं नाही. बाबा हा नेहमी मुलींसाठी प्रथम स्थानी असतो. 

अभिनेता शाहरूख खानच्या प्रॉडक्शनखाली निर्मित 'बदला' चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका बजावली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. आता ते अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात झळकणार आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता आयुषमान खुरानासह 'गुलाबो सिताबो' चित्रपटामध्ये देखील दिसणार आहेत.