मोहम्मद कैफकडून कतरिनाच्या रिलेशनवर वक्तव्य म्हणाला, कतरिना माझी...

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. 

Updated: Nov 10, 2021, 05:08 PM IST
मोहम्मद कैफकडून कतरिनाच्या रिलेशनवर वक्तव्य म्हणाला, कतरिना माझी... title=

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ सध्या चर्चेत आहे. पहिलं कारण म्हणजे तिचा सूर्यवंशी हा चित्रपट कमाईच्या बाबतीत शंभर कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे आणि दुसरं कारण म्हणजे तिच्या लग्नाची चर्चा. पण आज एक वेगळ्या विषयामुळे कतरिना कैफ चर्चेत आहे. ते कारण म्हणजे, कतरिना कैफ आणि क्रिकेटर मोहम्मद कैफ यांच्या आडनावांबद्दल आणखी एक उल्लेख समोर आला आहे. कतरिना कैफ आणि मोहम्मद कैफ यांची आडनावं सारखीच आहेत आणि या कारणास्तव सोशल मीडियावर या दोघांमधील संभाव्य संबंधांबद्दल बरेच उल्लेख आहेत.

एकदा सोशल मीडियावर एका यूजरने थेट मोहम्मद कैफला ही गोष्ट विचारली होती. तुमचा आणि कतरिना कैफचा काही संबंध आहे का? नसेल तर भविष्यात त्याची काही शक्यता आहे का? असा प्रश्न युजरने विचारला होता. तेव्हा मोहम्मद कैफने उत्तर देत म्हणाला की, मी अजून तरी संबंधित नाही... पण कतरिनाचं आडनाव कसं पडलं याची मी एक कथा ऐकली होती आणि त्या कथेनुसार ती माझ्याशी संबंधित आहे.

आता आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका स्टोरीबद्दल देखील सांगू ज्यामध्ये कतरिना कैफ आणि मोहम्मद कैफ यांच्या नात्याबद्दल सांगण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कतरिना कैफ पूर्वी तिच्या आईचं आडनाव टर्कोटे वापरत असे. तिच्या वडिलांचं नाव मोहम्मद कैफ होतं जे काश्मीरी वंशाचे ब्रिटिश होते. तर आई ब्रिटिश आहे. कतरिनाच्या आई-वडिलांचा लहानपणी घटस्फोट झाला आणि कतरिना तिच्या सात भावंडांसह तिच्या आईसोबत राहिली.

म्हणूनच ती आईचं आडनाव वापरायची. पण भारतात आल्यावर तिने बूम या चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर तिला नाव बदलण्याची सूचना मिळाली. हा तिचा पहिला चित्रपट होता आणि चित्रपटाच्या निर्मात्या आणि जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफ यांनी तिला तिचं आडनाव बदलण्याची सूचना दिली. कतरिनानेही आयशाची ही सूचना मान्य केली आणि असं म्हटलं जातं की, त्यावेळी मोहम्मद कैफ भारताचा क्रिकेटर होता. तो टीम इंडियाकडून खेळत होता. त्यावेळी कतरिना भारतात नवीन होती आणि आडनावाने क्रिकेटर ऐकल्यानंतर तिने आयेशाची सूचना मान्य केली.

दुसरं म्हणजे, असं देखील होऊ शकतं की, कतरिनाच्या पहिल्या आडनावामुळे लोकांना उच्चार करणं किंवा बोलणं कठीण होऊ शकतं आणि यामुळे तिच्या लोकप्रियतेत फरक पडला असता, म्हणून तिने तिचं नाव बदलून कतरिना कैफ ठेवलं. कतरिनाचे नाव बदलणं तिच्यासाठी भाग्यवान होतं. कतरिना टर्केट हे नाव खूप विलक्षण भावना आणतं तर कतरिना कैफ देखील लोकांना बोलण्यास सोपं वाटतं. मोहम्मद कैफसोबतच्या नात्याबद्दल बोलायचं झालं कतरिनाच्या वडिलांचं नावही मोहम्मद कैफ होतं आणि याच नावामुळे तिला हे आडनाव पडले. आता क्रिकेटर मोहम्मद कैफ स्वतः कतरिनाच्या नात्यात नसला तरी त्याचं नाव कतरिनाच्या नात्यात आहे.