या अभिनेत्रीची कार चोरट्यांनी केली चोरी

एका अभिनेत्रीची कार तिच्याच घरासमोरुन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. हिंदी टीव्ही सीरियल 'स्वरागिनी'मध्ये काम करणा-या हेली शाह या अभिनेत्रीची कार चोरीला गेलीय.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Aug 24, 2017, 02:17 PM IST
या अभिनेत्रीची कार चोरट्यांनी केली चोरी title=
Image Courtesy: hellyshahofficial Instagram

मुंबई : एका अभिनेत्रीची कार तिच्याच घरासमोरुन चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. हिंदी टीव्ही सीरियल 'स्वरागिनी'मध्ये काम करणा-या हेली शाह या अभिनेत्रीची कार चोरीला गेलीय.

अभिनेत्री हेला शाह मीरा-भाईंदर परिसरात राहते. आपल्या राहत्या घराजवळच तिने कार पार्क केली होती. मात्र, बुधवारी सकाळी तीन चोरांनी तिची कार चोरी केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे.

हेला शाह मीरा-भाईंदरमधील पूनम गार्डन परिसरातल्या सेरेनिटी इमारतीत राहते. त्याच ठिकाणी ती नेहमी गाडी पार्क करते. पण, सकाळी हेला शूटींगला जाण्यासाठी जेव्हा घराबाहेर पडली त्यावेळी तेथे आपली कार नसल्याचं तिच्या लक्षात आलं. या प्रकरणी हेलाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

सकाळी उठू पाहिल्यानंतर कार दिसली नाही. त्यानंतर सीसीटीव्ही पाहीले. त्यावेळी तीन चोरटे कारचा दरवाजा उघडून कार चोरून नेताना कॅमे-यात दिसलं. पहाटे ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही चोरी झाली आहे.