मुंबई : कलर्स चॅनलवरील 'नागिन' सिरिअलमध्ये नागिन 'शेषा'ची भूमिका साकारणारी अदा खान सायबर क्राइमची शिकार झाली आहे. तिचे डेबिट कार्ड हॅक करुन २ लाखाचा गंडा घातला गेला.
आजतक.कॉमच्या वृत्तानुसार, अदा खानने सांगितले की तिच्या अकाऊंटमधून २४ हजार रुपये गेले. आपल्या कार्डचा उपयोग केला जातोय हे तिच्या लक्षात आले.
त्यानंतर तिला सलग ४ मेसेज आले यामध्ये तिचे २ लाख रुपये गेले.
तिने लगेच बॅंकेत फोन करुन डेबिट कार्ड ब्लॉक केले. बॅंक आणि पोलिसांनी यात चांगली मदत केल्याचे अदा खानने सांगितले.