मुंबई : 'हिंदी मीडियम'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी इरफान खानला आणि विद्या बालनला सर्वोत्तम अभिनयासाठी फिल्मफेअर देण्यात आला आहे. विद्याचा हा कारकीर्दीतला सहावा फिल्मफेअर आहे.
'तुम्हारी सुलू' चित्रपटात साध्या-सुध्या गृहिणीची आरजे झालेल्या सुलोचनाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या विद्या बालनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर मिळाला.
परीणिता चित्रपटासाठी पदार्पणाच्या पुरस्कारानंतर पा, इष्किया (क्रिटीक्स), द डर्टी पिक्चर आणि कहानी असे अभिनयासाठी चार फिल्मफेअर तिला मिळाले होते.
विशेष म्हणजे अभिनेता राजकुमार रावनेही या सोहळ्यात तब्बल २ फिल्मफेअर पटकावले. ट्रॅप्ड चित्रपटातील भूमिकेसाठी क्रिटीक्सचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि बरेली की बर्फी चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार राजकुमारने पटकावला आहे. तर 'हिंदी मीडियम'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी तर इरफान खानला फिल्मफेअर देण्यात आला.
फिल्मफेअरच्या झगमगत्या सोहळ्याचं सूत्रसंचालन किंग खान शाहरुख आणि फिल्ममेकर करण जोहर यांनी केलं. मुंबईतील वरळीमध्ये शनिवारी रात्री हा शानदार सोहळा पार पडला.