महाकाली मालिकेतील दोन अभिनेत्यांचा अपघातात मृत्यू

महाकाली या पौराणिक मालिकेतील दोन टीव्ही अभिनेत्यांचा पालघरमध्ये अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या मालिकेतील गगन कांग आणि अर्जित लवानिया या दोन्ही टीव्ही अभिनेत्यांचा अपघातात जागीत मृत्यू झाला.

Updated: Aug 19, 2017, 08:03 PM IST
महाकाली मालिकेतील दोन अभिनेत्यांचा अपघातात मृत्यू title=

मुंबई : महाकाली या पौराणिक मालिकेतील दोन टीव्ही अभिनेत्यांचा पालघरमध्ये अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या मालिकेतील गगन कांग आणि अर्जित लवानिया या दोन्ही टीव्ही अभिनेत्यांचा अपघातात जागीत मृत्यू झाला.

उंबरगाव येथून महाकालीसाठीचे शूटिंग आटोपून ते मुंबईच्या दिशेने येत होते. यावेळी मुंबई-अहमदाबाद मार्गावर मनोर येथे त्यांच्या कारला कंटेनरने धडक दिली. 

ही धडक इतकी भीषण होती या अपघातात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या कारमध्ये गगन आणि अर्जित प्रवास करत होते. 

महाकाली या मालिकेत गगन इंद्रदेवाची तर अर्जित नंदीची भूमिका साकारत होता. गगनने या आधीही सोनी वाहिनीवरील एका मालिकेत काम केले होते.