तुझ्यात जीव रंगला : राणा मॅनेजर सखीसोबत घेणार का जुळवून?

मुंबई : राणाच्या मालिकेत म्हणजे तुझ्यात जीव रंगलाच्या मालिकेत आता इंटरनॅशनल कुस्तीमुळे वेगळं वळण मिळालं आहे. राणा पाठकबाईंसाठी इंटरनॅशनल कुस्ती खेळायला आणि मॅनेजर बाई सखीसोबत जुळवून घेण्यास तयार झालाय खरा? पण हे त्याला जमणार आहे का? 

तसेच मॅनेजर सखी अगदी सरळ राणाच्या कुस्तीवरच घाव घालते. मॅटवरची कुस्ती खेळायची असेल तर राणाला मातीतली कुस्ती विसरायला लागेल असं सखी सांगते. तसेच राणाचा सगळा खुराक त्यांच गावरानं तर्रीचं जेवण बंद करून अगदी भाज्या खाण्यास सांगते. आणि हेच राणासाठी अगदी कठीण आहे. दरम्यान रेणू आणि अंजली राणाबद्दल बोलत चालत असताना रेणू अंजलीला म्हणते सखीबद्दल मागचे पुढचे ठाऊक नसताना तिच्या ताब्यात राणाला देणे हे काही बरं नाही. पण तिच्या बोलण्याकडे अंजली दुर्लक्ष करते. पुढे तेवढ्यावरच रेणू न थांबता पुढे म्हणते की, राणादा किती भोळा आहे हे तुला ठाऊक आहे ना? आणि जास्तवेळ व तो ज्याच्या सानिध्यात राहतो त्याचेच काही वेळाने ऐकू लागतो याकडे जरा लक्ष दे नाहीतर हातातून निसटून जाईल नवरा हे लक्षात ठेव. रेणूच्या बोलण्याचा विचार अंजली करेल का आणि राणाला मॅनेजर सखी पासून दूर ठेवील का?