Animal मध्ये न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीला मिळालं इतकं मानधन, वाचून बसेल धक्का

Tripti Dimri Fees : 'ॲनिमल' मध्ये न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीला मानधन म्हणून मिळाली इतकं रक्कम, आकडा ऐकून तुम्हालाही होईल आश्चर्य 

दिक्षा पाटील | Updated: Dec 15, 2023, 03:31 PM IST
Animal मध्ये न्यूड सीन देणाऱ्या तृप्ती डिमरीला मिळालं इतकं मानधन, वाचून बसेल धक्का title=
(Photo Credit : Social Media)

Tripti Dimri Fees : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी ही सध्या तिच्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे आणि त्यापेक्षा जास्त तिच्या न्यूड सीनमुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला, तेव्हा पासूनच तृप्तीच्या न्यूड सीनची चर्चा सुरु आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे तर वर्ल्‍डवाइड 750 कोटी कमावले. या चित्रपटातील तृप्तीचा स्क्रिन टाईम कमी असला तरी तिनं सगळ्यांच्या मनात एक छाप सोडली आहे. तिच्यामुळे प्रेक्षकांना नवीन क्रश मिळाली आहे. अशात आता या चित्रपटात न्यूड सीन देणासाठी तृप्तीनं किती मानधन घेतलं हे जाणून घेण्याची सगळ्यांची इच्छा होती. तर अखेर त्या संबंधीत माहिती ही समोर आली आहे. तिनं घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून नक्कीच तुम्हाला पण आश्चर्य होणार आहे. 

या चित्रपटातील या भूमिकेसाठी तृप्तीनं फारच कमी मानधन घेतलं आहे. लाइफस्टाइल आशियाच्या रिपोर्ट्नुसार, तृप्तीनं तिच्या या भूमिकेसाठी फक्त 40 लाख रुपये मानधन घेतलं. मात्र, यावर अजूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कारण ना तृप्तीनं नाही निर्मात्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे तृप्तीचा इंटीमेट सीन जितका चर्चेत होता तितकी रश्मिकाच्या भूमिकेची चर्चा झालीच नाही, किंवा त्याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे पहिल्यांदा लीड अभिनेत्री असूनही रश्मिका चर्चेत नव्हती. तिनं या चित्रपटात ‘भाभी 2’ उर्फ झोयाची भूमिका साकारली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इतर कलाकारांनी किती मानधन घेतलं?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूरनं या चित्रपटासाठी 70 कोटी घेतले. रश्मिकानं 4 कोटी, बॉबी देओलनं 4 कोटी आणि अनिल कपूर यांनी 2 कोटी घेतल्याचे म्हटले जाते. या सगळ्या कलाकारांच्या तुलनेत तृप्तीनं खूप कमी मानधन घेतंलं आहे. या चित्रपटातील तृप्तीची भूमिका ही खूप जबरदस्त ठरली आहे.  

हेही वाचा : 'एक चित्रपट हिट झाला तर भाव वाढला'; विमानतळावर चाहत्याला धक्का मारणाऱ्या बॉबी देओलवर नेटकरी संतापले

तृप्तीनं तिच्या करिअरची सुरुवात ही ‘पोस्टर बॉयज’ या चित्रपटातून केली होती. नेटफ्लिक्सवरील 'कला', 'बुलबुल' आणि 'लैला मजनू'सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, तिला या चित्रपटातून जास्त लोकप्रियता मिळाली नाही. तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट हा 'ॲनिमल' ठरला आहे. तर तिचे इन्स्टाग्रामवर 700K फॉलोवर्स होते. तर आता ते वाढून 3.8 मिलियन झाले आहेत.