'एक चित्रपट हिट झाला तर भाव वाढला'; विमानतळावर चाहत्याला धक्का मारणाऱ्या बॉबी देओलवर नेटकरी संतापले

Bobby Deol Viral Video : बॉबी देओलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 15, 2023, 02:29 PM IST
'एक चित्रपट हिट झाला तर भाव वाढला'; विमानतळावर चाहत्याला धक्का मारणाऱ्या बॉबी देओलवर नेटकरी संतापले title=
(Photo Credit : Social Media)

Bobby Deol Viral Video : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्यानं खलनायकाची भूमिका साकरली असली तरी देखील त्याच्या चाहत्यांची यादी खूप वाढली आहे. खरंतर या चित्रपटातील अबरारनं त्याच्या अॅक्शननं आणि डान्सनं सगळ्यांच्या मनात जागा केली आहे. दरम्यान, नुकताच बॉबी देओलचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत घाईत असलेल्या बॉबीनं कशाप्रकारे त्याच्या एका चाहत्याला धक्का दिला हे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बॉबीनं काळ्या रंगाचं प्रिंटेड स्वेटशर्ट आणि काळ्या रंगाची कार्गो परिधान केली आहे. तर व्हिडीओच्या सुरुवातीला धावत आलेला बॉबी त्याच्या एका चाहत्याला धक्का देत पुढे जाताना दिसत आहे. यावेळी फक्त बॉबी नाही तर त्याची संपूर्ण टीम ही घाईत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की त्यानं त्या व्यक्तीला किती वाईट पद्धतीनं धक्का दिला. हे फार चुकीचं होतं. यानं 25 वर्षात एक हिट दिला आणखी बघा यांचे खराब चित्रपट. दुसरा नेटकरी म्हणाला, जेव्हा मी त्याला तीन वर्षांपूर्वी मुंबई विमानतळावर पाहिलं होतं, तेव्हा तो इतक्या घाईत नव्हता. तिसरा नेटकरी म्हणाला, त्याला रनवेवर आणखी एका फाईटसाठी उशिर होत असेल. आणखी एक नेटकरी म्हणाला, एक चित्रपट हिट झाल्यानं त्याचा भाव वाढला आहे. 

हेही वाचा : VIDEO : 'फायटर'च्या प्रदर्शनाआधी तिरुपती बालाजी दर्शनाला पोहोचली दीपिका पदुकोण, JNU प्रकरणाचा इफेक्ट?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या आधी बॉबी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तो त्याच्या या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतून बाहेर येत होता. त्यावेळी एका व्यक्तीला मिठी मारत बॉबी रडताना दिसला. त्यानंतर तो स्वत: ला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसला. याशिवाय प्रेक्षकांकडून मिळणारा पाठिंबा पाहता त्यानं सगळ्यांचे आभार मानले. बॉबी त्याच्या चाहत्यांना म्हणाला होता की 'तुमचे खूप-खूप आभार. देव खरंच दयाळू आहे. या चित्रपटाला इतकं प्रेम मिळतंय. असं वाटतंय की स्वप्न पाहत आहोत.' या चित्रपटानं 14 दिवसात भारतात बॉक्स ऑफिसवर 476.84 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्‍डवाइड 785 कोटींची कमाई केली आहे.