sonalee kulkarni आणि अमृताचं वैर..पुन्हा एकदा तोच वार..Video व्हायरल

हा फोटो पाहून आधी तर सोनाली खूप हसली आणि म्हणाली कि तिला माहित होत हाच..

Updated: Sep 18, 2022, 06:28 PM IST
sonalee kulkarni आणि अमृताचं वैर..पुन्हा एकदा तोच  वार..Video व्हायरल  title=

Sonalee kulkarni on amruta khanvilkar: झी मराठी वाहिनीवरील(ZEE MARATHI) बस बाई बस हा कार्यक्रम अल्पावधीतच सुपरहिट झाला अनेक क्षेत्रातील महिलंनी हजेरी लावत आपले अनुभव शेअर केले जे पाहताना प्रेक्षकांनीसुद्धा चांगलीच वाहवा केली. नुकतेच या कार्यक्रमात अप्सरा सोनाली कुलकर्णी ने हजेरी लावली.

यावेळी सोनालीने अनेक विषयांवर छान छान गप्पा मारल्या अनेक गोष्टींवर दिलखूलासाप्रमाणे बोलली . 

बस बाई बस्स या कार्यक्रमात एक छोटासा गेम असतो ज्यात सुबोध भावे(SUBODH BHAVE) येणाऱ्या पाहुण्यानं काही फोटो दाखवतो ज्यावर त्यांना दिलखुलासपणे स्पष्ट आपल्या मनातलं बोलायचं असत . 

यावेळी सोनाली कुलकर्णीला अमृता खानविलकरचा(AMRUTA KHANVILAKR) फोटो दाखवण्यात आला आणि विचारण्यात आलं कि तिच्याविषयी मनात जे आहे ते बोलावं तसाच अनेक जण म्हणतात कि त्या दोघींमध्ये  वैर(COLD WAR BETWEEN AMRUTA AND SONALEE KULKARNI) आहे  यावर मनात जे आहे ते बोलायला सांगितलं.. 

हा फोटो पाहून आधी तर सोनाली खूप हसली आणि म्हणाली कि तिला माहित होत हाच फोटो दाखवला जाईल पण ,आमच्यात काहीही वैर नाहीये दोघीनींही एकत्र कामाला  सुरवात केली नटरंग सारखा सुपरहिट सिनेमा त्याच यश वाटून घेतलं ,आतापर्यंत पुन्हा कधी सहकलाकार म्हणून

एकत्र काम नाही केलं म्हणून कदाचित आमच्यात म्हणावी तशी मैत्री होऊ शकली नाहीये पण आमच्यात काहीही वैर नाहीये हे खरं आहे.