KL Rahulच्या खराब कामगिरीमुळे Athiya Shettyने लग्न केलं Cancel?

केएल राहुलच्या खराब कामगिरीमुळे त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी हिने लग्न Cancel केली आहे...

Updated: Aug 29, 2022, 01:33 PM IST
KL Rahulच्या खराब कामगिरीमुळे Athiya Shettyने लग्न केलं Cancel? title=
trending news asia cup ind vs pak 2022 kl rahul bad performace and athiya shetty cancel marriage

Athiya Shetty Cancel Marriage: आशिया कप 2022मध्ये रविवारी भारतीय खेळाडूने कमाल केली. हार्दिक पांड्या आणि जडेजा या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर जडेजा आऊट झाला. मात्र पांड्या आणि जडेजा या दोघांची खेळी भारतासाठी मोलाची होती. पण काही खेळाडूंचं प्रदर्शन रविवारी बघायला मिळालं नाही. केएल राहुलसाठी रविवारचा दिवस चांगला नव्हता. केएल राहुलच्या खराब कामगिरीमुळे त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी हिने लग्न Cancel केली आहे, असं बोलं जातं आहे. (trending news asia cup ind vs pak 2022 kl rahul bad performace and athiya shetty cancel marriage)

खरंतर, भारत-पाक सामन्यात टीम इंडियाची बॉलिंग जबरदस्त होती. मात्र विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी इंडियन टीमला खूप संघर्ष करावा लागला. उपकर्णधार राहुलला खाते न उघडताच मैदानाबाहेर जावं लागलं. पहिल्याच बॉलवर आऊट झाल्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

सोशल मीडियावर राहुलची गर्लफ्रेन्ड आणि सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिला राहुलच्या अपयशाचं कारण ठरवलं जातं आहे. या दोघांना लग्नावरुन सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतं आहे. 

केएल राहुलला बाद केल्यानंतर अथिया शेट्टीची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. अगदी राहुलची खराब कामगिरीनंतर शेट्टी कुटुंब काय करत असेल हे सुद्धा नेटकऱ्यांनी दाखवलं आहे.

युजर्स त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल मीम्स शेअर करत आहेत. एका यूजरने त्यांचं लग्न रद्द झाल्याचं लिहिलं आहे.

आणखी एका युजरने अथियाच्या अभिनयाची खिल्ली उडवत एक ट्विट केले आहे. केएल राहुलचे क्रिकेट करिअरही काहीसे अथिया शेट्टीच्या अभिनय कारकिर्दीसारखे होत आहे.