Sushant Singh Rajput ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट, मोस्ट वाँटेड ड्रग सप्लायर गजाआड

Sushant Singh Rajput च्या मृत्यूशी संबंधित ड्रग प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. 

Updated: Sep 20, 2022, 09:39 AM IST
Sushant Singh Rajput ड्रग प्रकरणात नवा ट्विस्ट, मोस्ट वाँटेड ड्रग सप्लायर गजाआड title=
treading news sushant singh rajput new twist and drug supplier kr arrest nm

Sushant Singh Rajput : बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूर (Sushant Singh Rajput) आज आपल्यासोबत नाही, तरी त्याचे फॅन्स आजही त्याला मीस करतात. सुशांतचं अचानक जाणं हे अनेकांना धक्का होता. सुशांतची बहिण प्रियंका सिंह (Priyanka Singh) हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली त्यानंतर अभिनेता सुशांतचं नाव ट्रेंड कर आहेत. Saw Sushant In Dreams हे ट्विटरवर ट्रेंड  (trending on twitter) होतं आहे. 

सुशांत सिंह राजपूत प्रकरण (Sushant Singh Rajput Case)

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.  मोस्ट वॉन्टेड ड्रग सप्लायरसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे.  भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग सप्लायर (drug supplier) कैलाश राजपूत  (Kailash Rajput) KR लंडनमध्ये (London) असल्याचं समोर आलं आहे. त्याला हाऊस अरेस्ट करण्यात आलं असून मुंबई पोलीस(Mumbai Police) त्याला भारतात (India) आणण्याची तयारी सुरु झाली आहे. (treading news sushant singh rajput new twist and drug supplier kr arrest nm)

पोलीस सूत्रांनी सांगितले की, कैलाश राजपूत उर्फ ​​केआरची माहिती यूके एजन्सींना शेअर करण्यात आली असून त्याला भारतात आणण्यासाठी भारतीय एजन्सी लंडन पोलिसांच्या संपर्कात आहे. मोस्ट वॉन्टेड (Most Wanted) कैलाश राजपूतचा पासपोर्ट यूके (UK)एजन्सींनी जप्त केला असून त्याला नजरकैदेतही (house arrest) ठेवण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, कैलाश राजपूत हा डी-कंपनीमधील (D-Company) अनीस इब्राहिमचा (Anees Ibrahim) उजवा हात मानला जातो. जो डी-कंपनीच्या आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा ऑपरेशनल प्रभारी आहे. कैलाश राजपूत तोच आहे, ज्याचं नाव सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज सप्लाय सिंडिकेटमध्येही समोर आलं होतं. 

कोण आहे मोस्ट वॉन्टेड KR? (Who is most wanted KR)

- कैलाश राजपूत 2014 पासून जामिनावर सुटला होता
- त्यानंतर तो दुबईत गेला
- आता मात्र तो यूकेमध्ये गजाआड झाला आहे.
- आंतरराष्ट्रीय ड्रग सप्लायर
- लुक-आउट नोटीस जारी
- दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल, NCB आणि महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) च्या विविध प्रकरणांमध्ये मोस्ट वॉन्टेड आहे.