मुंबई : बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार हा त्याच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाला मिळत असलेला जोरदार प्रतिसाद पाहता या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे.
गेल्या तीन दिवसात या सिनेमाने तब्बल ४८.७० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर एकट्या रविवारी या सिनेमाने १८.५० कोटींचा गल्ला जमवला.
एका सामाजिक विषयावर आधारित या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच होती. त्यामुळे या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळणार असे बोलले जात होते. त्यानुसार सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने शनिवारी १७.१० कोटी रुपयांची कमाई केली. तर पहिल्या दिवशी १३.१० कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणजेच एकूण ३०.२० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
टॉयलेट एक प्रेम कथा हा एक सामाजिक संदेश देणारा सिनेमा आहे. केवळ १८ कोटी रुपये एवढ्या बजेटमध्ये हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या या सिनेमाने बजेटचा खर्च अगोदरच वसूल केला आहे.