मालिकेत लग्नासाठी व्याकुळ असलेल्या पोपटलालला तीन मुलं; एका एपिसोड साठी घेतो इतके रूपये

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने छोट्यापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला पोट धरून हसण्यास भाग पाडलं आहे. 

Updated: Apr 11, 2021, 03:22 PM IST
मालिकेत लग्नासाठी व्याकुळ असलेल्या पोपटलालला तीन मुलं; एका एपिसोड साठी घेतो इतके रूपये title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने छोट्यापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला पोट धरून हसण्यास भाग पाडलं आहे. मालिकेला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. मालिकेतील प्रत्येक प्रात्रासोबत प्रेक्षकांचं एक नात तयार झालं आहे. मालिकेतील पोपटलालची भूमिका पार पाडणारा अभिनेता श्याम पाठकच्या चाहत्यांच्या संख्येत आता मोठी वाढ झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे मालिकेत लग्नासाठी व्याकुळ असणार पोपटलाल खऱ्या आयुष्यात मात्र तीन मुलांचा बाप आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shyam Pathak (@shyampathakpopu)

पोपटलालला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. पहिल्या मुलाचं नाव पार्थ, दुसऱ्या मुलीचं नाव नियती आणि सर्वात छोट्या मुलाचं नाव शिवम पाठक असं आहे. खरंतर प्रत्येकाला शॉपिंग करायला, फिरायला, पार्टी करायला फार आवडतं पण श्यामला मात्र व्यस्त वेळापत्रकातून मिळालेला वेळ कुटुंबासोबत व्यतीत करायला आवडतो. 

श्याम पाठक मालिका, जाहिराती इत्यादी माध्यामातून कमाई करतो. तर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या एका एपिसोडसाठी तब्बल 60 हजार रूपयांचं मानधन स्वीकारतो. मालिकेतील त्याची पोपटलालची भूमिका चाहत्यांना फार आवडते.  एवढचं नाही तर श्यामकडे महागड्या गाड्या देखील आहेत. त्याच्याकडे जवळपास 50 लाख रूपयांची मर्सिडीज आणि टोयटो इनोव्हा क्रिस्टा कार आहे.