NMACC Launch: अंबानींच्या पार्टीला 'जेठालाल' यांची सपत्निक हजेरी; चाहत्यांनी 'ती' हाक मारताच...

TMKOC Actor Dilip Joshi with Wife at NMACC India Launch: दोन दिवसांपासून सुरू झालेल्या 'एनएमएसीसी इंडिया' (NMACC India Launch) या नीता अंबानी यांच्या कल्चर सेंटरच्या लॉन्चसाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यामुळे सध्या इंटरनेटवर याच सोहळ्याची तुफान चर्चा आहे. यावेळी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Dilip Joshi with Wife) या मालिकेतील लोकप्रिय कलाकार दिलीप जोशी आणि त्यांच्या पत्नी जयमाला जोशी यांनी हजेरी लावली होती. 

Updated: Apr 2, 2023, 01:02 PM IST
NMACC Launch: अंबानींच्या पार्टीला 'जेठालाल' यांची सपत्निक हजेरी; चाहत्यांनी 'ती' हाक मारताच... title=
NMACC India

Dilip Joshi at NMACC India Event: उद्योगपती मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी यांच्या 'नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर'चे (एनएमएसीसी) (Nita Ambani Ambani Culture Centre) ब्रांदा येथे नुकतेच भव्य उद्घाटन करण्यात आले. या कल्चर सेंटरच्या ऑपनिंग सेरेमनीसाठी (NMACC Gala) अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या सेलिब्रेटींनीही (Bollywood Celebrity at NMACC India) यावेळी आकर्षक वेशभुषा परिधान केली होती. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष त्यांच्याकडेच वेधले होते.

यावेळी करीना कपूर, सैफ अली खान, अलिया भट्ट, महेश भट्ट, सारा अली खान, सोनम कपूर, अनन्या पांडे, शाहरूख खान, गौरी खान, आर्यन खान, सुहाना खान, दीपिका पादूकोन, रणवीर सिंग आणि अनेक मोठे मोठे सेलिब्रेटी, राजकारणी, व्यावसायिक आणि क्रिकेटपटू या भव्यदिव्य सोहळ्याला उपस्थित होते. ठाकरे परिवारही (Bollywood Celebrity Day 2) यावेळी या सोहळ्याला उपस्थित होते. 

दिलीप जोशी यांची सपत्निक हजेरी : 

यावेळी या सेलिब्रेटींच्या गर्दीमध्ये उपस्थिती दर्शवली होती ती म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) या मालिकेतील 'जेठालाल' म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते दिलीप जोशी यांनी. यावेळी ते सपत्निक आले होते. यावेळी सेलिब्रेटींनी महागडी आणि आकर्षक अशी वेशभुषा केली होती. परंतु दिलीप जोशी आणि त्यांच्या पत्नी जयमाला जोशी (Dilip Joshi Wife) यांनी अगदी साधा पण मोठ्या पार्टीला शोभेल असा लुक कॅरी केला होता. यावेळी अंबानींच्या या भव्य पार्टीला आलेल्या सेलिब्रेटींचे लुक्स (Celebrity Fashion NMACC Launch) हे काहींना आवडले तर काहींच्या पसंतीस पडले नाहीत. परंतु दिलीप जोशी यांचा लुक पाहून मात्र त्यांच्या फॅन्सनी त्यांचे भरभरून कौतुकही केले. 

'ती' हाक मारली आणि... : 

दिलीप जोशी आणि त्यांच्या पत्नी जयमाला जोशी (Jaymala Joshi) यांनी काळ्या रंगाचे ट्रेडिशनल वेअर घातले होते. दिलीप जोशी यांनी चमकणारा पांढऱ्या कॉलरचा असा काळा कुर्ता परिधान केला होता. तर त्यांच्या पत्नी जयमाला यांनी सुंदर काळा पारंपारिक पंजाबी ड्रेस घातला होता. त्याचसोबत त्यांनी हातात ट्रेडिशनल डायमंड वर्कचे क्लच (Clutch) हातात घेतले होते. त्यांच्या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी तूफान कमेंट्स (Dilip Joshi Viral Video) केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बबिता कुठे आहे? : 

यावेळी दिलीप जोशी आपल्या पत्नीसोबत पापाराझींना पोझ देताना कुणी त्यांना 'टप्पू के पापा' म्हणून हाक मारत होते तर काही जण जेठालाल खऱ्या दयाबेनसोबत आले परंतु बबिता कुठे आहे? अशी टिप्पणीही काही नेटकरी करताना दिसत होते. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली होती. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या मालिकेतील जेठालाल यांची भुमिका करणाऱ्या दिलीप जोशी यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक झाले होते.