कॅमेऱ्यासमोर जॅकेटची बटण उघडली, टीना दत्ताकडून फोटो शेअर

टीना दत्ताने पुन्हा एकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Updated: Dec 19, 2021, 07:09 PM IST
कॅमेऱ्यासमोर जॅकेटची बटण उघडली, टीना दत्ताकडून फोटो शेअर title=

मुंबई : टीव्हीची 'संस्कारी बहू' टीना दत्ताने पुन्हा एकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये टीनाने टाइट ड्रेस घातला आहे. याचबरोबर टीनाने श्रगची बटणं उघडून फोटोशूट केलं आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला आहे. ज्यामध्ये तिची अदा पाहून लोकं अस्वस्थ होत आहेत. तर काही लोकं तिचं कौतुक करत आहेत.

बटण उघडून  केलं फोटोशूट 
या बोल्ड फोटोशूटमध्ये टीना दत्ताने तिच्या श्रगची बटणं उघडली आणि अशा पोज दिल्या की, चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. अभिनेत्रीचा हा लूक पाहून लोकांनी तिचा बोल्ड लूक पाहून कौतुक केलं. तर काहींनी मात्र तिला खूप ट्रोलही केलं. 

केला खास लूक
या फोटोत टीना दत्ताने राखाडी रंगाचा लोकरीचा क्रॉप टॉप घातला आहे. यासोबतच तिने ग्रे कलरची शॉर्ट पँट घातली आहे आणि ज्याची बटणे उघडली आहेत याचबरोबर तिने याला मॅचिंग श्रग परिधान केला आहे. फोटोत अभिनेत्रीने हलका  मेकअप केलाय. त्याचबरोबर मोकळे केस ठेवून आपला लूक परिपूर्ण केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

स्वतःचा फोटो शेअर केला
हा फोटो अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'वीकेंडच्या मूडमध्ये येण्याची तयारी'' अभिनेत्रीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.